Home राजकारण लवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….

लवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….

हदगाव हिमायतनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा बाबुराव कदम कोहळीकर यांना केले आग्रह….

भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर
9145043381

हिमायतनगर प्रतिनिधी /-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय नांदेडच्या हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर केलाय, शिवसेना नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवाघा बाजार येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा आग्रह कदम यांना केलाय.

Bhumiraja news!
मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने बाबुराव कदम यांनी बंडखोरी करत निवडणूक अपक्ष लढवली होती, त्यात अल्पशा मताने कदम यांचा पराभव झाला होता. त्या नंतर राज्यात घडलेल्या राजकीय बदलानंतर बाबुराव कदम यांनी आज समर्थकांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात हदगाव हिमायतनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याची मागणी केलीय. या मेळाव्या नंतर बोलताना बाबुराव कदम यांनी आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगांवला आमंत्रित करून एक मोठी सभा घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित जनसमुदायास सांगितले आहे.

तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा /-9145043381

Previous articleबटवाडी बु।। ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
Next articleलोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम संपन्न…