Home Breaking News बटवाडी बु।। ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात...

बटवाडी बु।। ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

नयनाताई आखरे पाटिल सरपंच बटवाडी बु।।  यांच्या हस्ते पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले..

राहुल ईगळे भूमीराजा संपादक अकोला:- अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या थाटामाटात बटवाडी येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात संपन्न झाली आहे। सदर कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर  प्रकाश टाकुन त्यांच्या समाजकार्य चा उलगडा करण्यात आला.साहित्यरत्न,लोकशाहिर,अण्णाभाऊसाठे यांचा जन्म 1 आँगष्ट 1920 ला जिल्हा सांगली तालुका वाळवा ग्राम वाटेगाव येथे जन्मलेल्या साहित्यासम्राट ,लोकशाहिर, अण्णाभाऊसाठे यांची आज जयंती आहे. अण्णाभाऊसाठे यांनी एकुण 35 कादंबरी,13 लोकनाट्य,13 कथा संग्रह, 15 पोवाडे 1 शाहिरी पुस्तक,1 प्रवास वर्णन 7 चित्रपट कथालिहतो रशियात जाऊन म्हणतो.व त्यांचे साहित्य जगातील सत्तावीस भाषेत अनुवादित होते. अश्या या महामानवाला विनंम्र अभिवादन करण्यात आले वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सचिव आर.आर ईंगळे तर उपस्थित ग्रा.पं सदस्य सतिष आखरे,भाष्कर कराळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक महेंद्र गायकवाड, विनायकराव मते ,डाँ सुनील बोरकर ,शिरू पाटिल, ग्रामपंचायत कर्मचारी तेजराव जाधव,भगवान गायकवाड, तस्लीम शेख, उपस्थित होते.

 

Previous articleब्रिटन राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये संकेत सरगर ची रौप्य पदकाला गवसणी
Next articleलवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….