Home Breaking News वाई येथे गोठ्यावर विज पडून एक गाय जळून खाक; तर तीन जनावरे...

वाई येथे गोठ्यावर विज पडून एक गाय जळून खाक; तर तीन जनावरे भाजून गंभीर जखमी, गोठ्यावर विज पडल्याने पेटली झोपडी.

परभणी,(आनंद ढोणे) पूर्णा तालूक्यातील वाई लासीना येथील शेतकरी गोविंद मेघाजी डाखोरे यांच्या गट नंबर ३२ मधील आखाड्यावर २६ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरा मध्यरात्रीनंतर अचानक विज पडली. विज पडल्याने गोठ्याला आग लागली.आगीच्या लोळात गोठ्यात बांधलेली मोठी एक गाभण गाय जळून खाक झाली तर दोन मोठी गो-हे भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटनेचा पांगरा सज्जाचे तलाठी पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा तहसीलदार यांना सादर केला आहे. तसेच गोठ्यात असलेले ईलेक्ट्रॉनिक जनरेटर देखील जळून गेले आहे.याघटनेत जवळपास दिड लाख रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.

Previous articleभाजपातर्फे कारगिल मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण..व कारगिल विजय दिन मोठया उत्साहात केला साजरा
Next articleटेंभी येथील अवैधरित्या दारू विक्री व नागपंचमी निमित्त खेळले जाणाऱ्या गंजीपत्याचे डाव बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन!