Home Breaking News पळस फुलला

पळस फुलला

आला शिशिर शिशिर
रान ऊजाळलं सारं
तरु वल्लीच्या डोयाले
कशी लागलिया धार !!

अंगाचीया लाही लाही
झाडं झालय नागड
पानं झडलिया सारी
आली आली पानगड !!

गावं गायरानात रे
कसं तांबडं फुटलं
जसं केसरी आभाळ
माळरानी उतरलं !!

रंगाची रे ऊधळण
सडा फुलांचा सांडला
रंगपंचमीचा सण
रानी पळस फुलला !!

उभ्या पळसात दिसे
कृष्ण मुरारी सावळा
रंगे रंगलारे रानी
रासक्रीडेचा सोहळा !!

रंग केसरी भगवा
रानोमाळ उधळला
भक्ती, विरक्ती संदेश
देई पळस जगाला !!

✍️वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

जिल्हा संपादक नांदेड
साप्ताहिक भुमीराजा न्युज नांदेड

Previous article_६१६ लोकांचे फरक बिल तातडीने शिक्षकांच्या खाती जमा करावे अन्यथा आंदोलन
Next articleश्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेत महिलांच्या कुस्त्यांचा सामना रंगला….