Home Breaking News

*गझल*
_________________________
येताच हात दोन्ही हातात आपले
अंतर मिटून जाते माझ्यातुझ्यातले

बोलू असेच कुठवर नजरेतुनी प्रिये?
सांगू अतातरी जे हृदयात साचले

वचनावरी प्रियेच्या ठेवून भरवसा
मी एकटेच अवघे आयुष्य काढले

ठरवूनही कुणाचे झालेच ना कधी
केवळ तुझ्यात होते काळीज गुंतले

झालेत आज इतके सगळे महान की
मानत कुणीच नाही कोणास थोरले

मी घेतल्या जगाच्या वाटून यातना
माझेच दुःख नाही कोणी हिरावले

नाही मला कधीही तू शोधलेस पण
आयुष्यभर तुला मी गझलेत शोधले

■ *चंद्रकांत कदम (सन्मित्र)*
*नांदेड (9921788961)*
*- साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड*
_________________________

Previous articleअकोला : गारपिटीचे तांडव थांबेना, बार्शीटाकळी, पातूरला पुन्हा झोडपले
Next articleएकतर्फी प्रेमातून तरुणीवार हल्ला केल्याची घटना समोर आली.