Home Breaking News तालुका कृषि प्रकल्पा अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे वाटप वादाच्या भोवऱ्यात!

तालुका कृषि प्रकल्पा अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे वाटप वादाच्या भोवऱ्यात!

👉 तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्या कार्यालयातील प्रकार…

@ कृषि वार्तापत्र @

हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी परवड हा विषय चिंतेचा बनलेला आहे. विविध योजने अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे परस्पर वाटप करुन, तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे खाजगी स्वियसाहाय्यक यांनी संगनमताने प्रकल्पाची निविष्ठेची परस्पर विल्हेवाट लावली आहे. असा धक्काच प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता, १७ सप्टेंबर रोजी सकाळी झेंडावंदन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या सोबत आलेला, एक खाजगी व्यक्ती प्रकल्पाचे दोन पोते उचलुन नेतो. हि बाब तालुका कृषी अधिकारी यांच्याच गाडीतुन नेत असताना घडत असेल तर, हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे यापैक्षा दुर्दैव कुठले म्हणावे लागेल. हा येणारा काळच ठरवेल.
गेल्या कित्येक महिन्यांपासून हाच तालुका कृषी अधिकारी कार्यालयत हजर राहत नाही. यांची शहानिशा कोणत्याच लोकनेत्यांनी का? केली नसेल, हाही मुद्दा अतिशय गंभीर आहे.
प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता, त्यांचांही खाजगी स्वियसाहाय्यक फोन उचलुन वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे देण्यास , त्यांना कोण भाग पाडतो. याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
आज शेकडो बेरोजगार तरुणांना नौकरी मिळत नाही. या गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे प्रभावी उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना कोणाचे बळ मिळते आहे. यांचा विद्यमान खासदार हेमंत भाऊ पाटील आणि विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी या उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा शोध घेऊन, शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी हिमायतनगर- हदगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत खोदलेल्या विहिरीचे बिल काढण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. आर्थीक देवाण-घेवाणी शिवाय फाईलवर सह्या होत नाहीत. असा गंभीर आरोप हिमायतनगर तालुक्यातील (माझे नांव सांगु नका) असे म्हणत कष्ट करुन पोटाला उमाशी मारणा-या एका शेतकऱ्याने केला आहे.

बळीराजाचे स्वप्नांना उजाळा देयायचा असेल तर, अशा उद्धट कृषि अधिकारी यांचा पर्दाफाश करुन, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करुन यांना दोन्ही तालुक्यातील शेतकरी धडा शिकविल्या शिवाय पर्याय नाही. असे ठिबक, तुषार , विहीरचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी बोलुन दाखवले आहे.

Previous articleटीईटी घोटाळयातील शिक्षकांना मासिक वेतन द्या, पगारवाढ देऊ नका : हायकोर्ट
Next articleनाशिक मध्ये 5 मुले बेपत्ता, मात्र मुले पळविणारी टोळी ही अफवा