Home Breaking News प्रयोगशिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांना लाकडी तेलघाणा उद्योग!

प्रयोगशिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांना लाकडी तेलघाणा उद्योग!

दीपावलीच्या मुहूर्तावर होणार उद्घाटन!!
———-
परभणी,(आनंद ढोणे) :- पूर्णा तालूक्यातील माखणी येथील प्रगतशील प्रयोगशिल शेतकरी जनार्धन आवरगंड पाटील यांनी पाच लाख रुपये भागभांडवल तयार करुन लाकडी तेलघाणा उद्योग नुकताच उभारला असून लाकडी तेलघाणा सुरु करुन काही लिटर तेलाची निर्मीती करुन शॅंपल घेत लाकडी तेलघाणा यशस्वी केला आहे. निर्मीती केलेले तेल त्यांनी परभणी येथील डॉ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कूलगुरु इंद्र मणी यांना भेट दिले आहे. यावेळी,प्रयोगशिल शेतकरी मंगेश देशमुख पेडगावकर, पंडित थोरात, प्रकाश हरकळ उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना देखील तेल भेट दिले.कृषी निगडीत लाकडी तेलघाणा चालू केल्यामुळे जनार्धन आवरगंड यांचे कुलगुरु डॉ इंद्र मणी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी सुभेच्छा देत अभिनंदन केले.सध्या सदरील लाकडी तेलघाणा माखणी येथे असून तो ताडकळस येथे मार्केटच्या ठिकाणी मोंढा येथे जागा उपलब्ध झाल्यास तेथे दीपावलीच्या मुहूर्तावर तेलघाणा चालू करणार असल्याचे आवरगंड यांनी सांगितले.जनार्धन आवरगंड हे अतिशय होतकरु प्रयोगशिल शेतकरी असून या पूर्वी त्यांनी माखणी येथे गावरान अंब्या पासून स्वादिष्ट आणि रुचकर असे लोणचे निर्मीती उद्योग चालू केला आहे. त्यास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून मागणी मिळते.यंदा आता त्यांनी लाकडी तेलघाणा हा ओंकार गृह उद्योग नावाने लाकडी तेलघाणा चालू केला आहे.त्यांच्या ह्या कृषी उद्योगात त्यांच्या पत्नी मिराताई आवरगंड मदत करतात.
लाकडी तेलघाण्यावर निर्मीती होणारे तेल हे केमिकल विरहित असल्यामुळे या तेलास मोठी मागणी असते.सोयाबीन वगळता या लाकडी तेलघाण्यावर भुईमूग शेंगदाणे, करडी, अंबाडी, नारळ आदी तेलबियांपासून तेल निर्मीती करता येते. या लाकडी तेलघाणा उद्योगात तासी ४० लिटर तेल निर्मीतीची क्षमता आहे.

Previous article*हिमायतनगर तालुक्यात राजकीय भुकंप होणार का…..*
Next articleनुकताच नरशी येथील नुरी हाँलमधे पाणी बजेट, कार्यशाळा संपन्न.