Home Breaking News प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोरडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लेवाड मॅडम यांचा सत्कार...

प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोरडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लेवाड मॅडम यांचा सत्कार संपन्न.

👉 सवना ज ग्रामपंचायतने
केला सन्मान.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 03 नोव्हेंबर 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे उपआरोग्या केंद्र आहे. पण येथील आरोग्य सेविका यांची रिक्त पद असल्याने, सवना ज चे संरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी वरीष्ठ आरोग्य अधिकारी नांदेड यांना भ्रमणध्वनीवर बोलुन हि अडचण सोडवुन घेतली आहे. त्यामुळे चिंचोरडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्तव्यदक्ष वैयक्तिक अधिकारी डॉ. सुप्रिया पल्लेवाड मॅडम यांनी लगेच एक आरोग्य सेविकेची नियुक्ती दिल्याने, सवना ज ग्रामपंचायतने कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लेवाड मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सवना ज संरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शेतात राबराब राबुन काळया आईची सेवा करणारी आपली आई, आपली बहिण समजुन आरोग्य सेविका यांनी अतिशय काळजीपूर्वक तपासणी करून, रुग्णांना दिलासा द्यावा. आपल्या वरीष्ठांना कुठलाही त्रास होणार नाही. याची दक्षता घ्यावी. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, सरपंच परमेश्वर गोपतवाड, एकघरीचे संरपंच सुनिल शिरडे, सेवानिवृत्ती मंडळ कृषी अधिकारी गुणवंत टारफे साहेब, डॉ. डोखळे, डॉ. वाघमारे, सर्व सिस्टर मॅडम सवना उपसरपंच प्रतिनिधी सोनबाजी राऊत, गजानन गोपेवाड पाटील, भिमरावदादा राऊत, मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Previous article*उत्तर महाराष्ट्र धनगर समाज शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागीय उपआयुक्तांकडे मांडला समस्यांचा पाढा*
Next articleरब्बी हंगामातील पेरणीस आला वेग…