Home Breaking News शेतकऱ्यांना विजेसाठी विषप्राशन करण्याची वेळ येत असेल तर, महावितरण कंपनीने चिंतन करावे.

शेतकऱ्यांना विजेसाठी विषप्राशन करण्याची वेळ येत असेल तर, महावितरण कंपनीने चिंतन करावे.

👉 चर्चा

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 11 डिसेंबर 2022

” महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतीचा विकास करण्यासाठी उपलब्ध विजेचा पुरवठा, पांदण रस्ते, संकरीत व सुधारित बियाणे, अल्पदरात रासायनिक, सेंद्रिय, जैविक खते, वेळोवेळी शेती तंज्ञाचे मार्गदर्शन अशा नानाविविध बाबी या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत.
संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे कनेक्शन तोंडुन शेतकऱ्यांना जणु आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त महावितरण कंपनी असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कौठा ज. येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्री महावितरण कंपनीच्या कार्यालयात जावुन डीपीची मागणी केली होती. डिपी मिळत नसेल तर, विष प्राशन करून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती. हा सारा प्रकार अनेकांनी पाहिला. पण ज्या बळीराजाच्या आर्त हाकेला किती प्रतिसाद मिळाला की नाही हे नविन डिपी दिल्यावरच लक्षात येईल.
त्याचप्रमाणे कार्ला येथील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपुर्वी हिमायतनगर विजवितरण कंपनीच्या कार्यालयात जावुन डी.पी. मागणी केली आहे. अतिवृष्टीने उघडा झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला विज मिळत नाही. हे कृषिप्रधान देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
पोटाच्या बेंबीला पिळ देऊन राबराब शेतात राबून ना उन, ना वारा, ना हिंस्र प्राणी पर्वा न करता काळया आईची सेवा सतत शेतकरी करतो. पण विजेअभावी रब्बीची पिके करपत असतील तर, महावितरणच्या वरीष्ठ अधिका-यांनी शेतकऱ्यांच्या भावनेची कदर करुन, हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना नविन डीपी बसवुन द्यावेत. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संबंध हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Previous article*रुग्ण हक्क परिषद आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल, पुणे यांचे एकत्रित काम सुरु – उमेश चव्हाण*
Next articleत्या वक्तव्याचा वंचित युवा आघाडी कडून निषेध आंदोलन