Home Breaking News त्या वक्तव्याचा वंचित युवा आघाडी कडून निषेध आंदोलन

त्या वक्तव्याचा वंचित युवा आघाडी कडून निषेध आंदोलन

मनोरुग्ण भाजप उपचार भीक फंड आंदोलन करून केला निषेध
१ रुपया भीक मांगुन केले आंदोलन

संदिप वानखडे प्रतिनिधी
अकोला:-
महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, महामहीम राज्यपाल, व भाजपचे पदाधिकारी हे सातत्याने महाराष्ट्र राज्याचे असलेले थोर समाजसेवक यांचा जाणीवपूर्वक अवमानकारक वक्तव्य करीत आहेत. राज्याच्या मंत्र्याने केलेल्या त्या वक्तव्याचा निषेधार्थ वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने निंबा फाटा येथे मनोरुग्ण भाजप उपचार करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून परिसरातून १ रुपया भीक मांगून निषेध व्यक्त केला.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मंगून शाळा चालविल्याचा वक्तव्य केले होते. त्या निषेधार्थ महाराष्ट्र भरातून निषेध करण्यात येत आहे. त्या वक्तव्याचा निषेध वंचीत बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गद्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे बाळापूर तालुकाध्यक्ष संदीप वानखडे, महासचिव सचिन रोहणकार, सुभाष तायडे, संदेश मोरे, धम्मपल तायडे, संजय वानखडे,राजू मोरे,अंकुश चोपडे, सिद्धार्थ घ्यारे, नागेश घ्यारे, निलेश तायडे,राहुल इंगळे, प्रभुदास अवारे , जिवन वानखडे, आदित्य वानखडे, मंगेश उमाळे, नागेश मोरे, राजकुमार घ्यारें , संजय शेगोकार,मगर साहेब यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleशेतकऱ्यांना विजेसाठी विषप्राशन करण्याची वेळ येत असेल तर, महावितरण कंपनीने चिंतन करावे.
Next articleवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला पुस्तके भेट…!!