Home Breaking News डॉ. मनोरामा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,...

डॉ. मनोरामा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क

बाळापूर – 20 डिसेंबर 2022 स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे रा. से. पथकाच्या वतीने मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर यांच्या मार्गदर्शनमध्ये संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रम करिता प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शैलेंद्र चव्हाण तर अध्यक्ष स्थानी प्रा. सुनील देशमुख होते. डॉ. चव्हाण सर यांनी आपल्या भाषणा मध्ये संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकून गाडगेबाबा यांना अंधश्रद्धा विषयी विलक्षण घृणा होती त्यासाठी त्यांनी आपल्या कीर्तना च्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. अध्यक्षीय भाषांनामध्ये प्रा. सुनिल देशमुख सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम बाठे यांनी केले. तर आभारप्रदर्शन कु. साक्षी महाले हिने केले. या कार्यक्रमा करिता बहुसंख्य रा. से. यो. स्वयं सेवक उपस्थित होते.

Previous articleनिवडणुकीपुर्वी विकास कामे न करता, सतत विकासाची कामे व्हावीत.
Next articleगाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ? – ऍड.चंद्रकांत निकम