Home Breaking News शेतकरी संघटित झाल्याशिवाय बदल होणार नाही -शेतकरी नेते विजय जावंधिया

शेतकरी संघटित झाल्याशिवाय बदल होणार नाही -शेतकरी नेते विजय जावंधिया

जय किसान फार्मर्स फोरमतर्फे राज्यातील ४० शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

शेतकरी संघटित झाल्याशिवाय काहीही बदल होणार नाही, तसेच व्यवस्था म्हणजे शेतीचे धोरण बदलायला पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंत व शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले. जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते “कृषिरत्न” पुरस्काराने सपत्निक सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे नि. जिल्हाधिकारी प्रतापसिंह काणकर, सेंद्रिय शेतीतज्ञ प्रल्हाद वरे, सदुभाऊ शेळके, इफकोच्या संचालिका साधनाताई जाधव, गोरकभाऊ बोडके, सुभाष शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी प्रास्तविका डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी डॉ.पंजाबरांवांचे कार्य व सेंद्रिय शेतीवर चर्चा झाली तसेच आमची माती आमची माणसं मासिकाच्या “शेतकरी गौरव” विशेषांक व दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. प्रसिद्ध गायक- गायिका रेखा महाजन, सुखदा महाजन, तुषार वाघुळदे यांनी सुमधुर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
पुरस्कार प्राप्त शेतकरी- शिवाजी घावटे(औरंगाबाद),तानाजी पवार(कळवण,नाशिक),टि एस ऑर्गो ऑर्गेनिक प्रा. लि.(नागपूर),अमित शिंदे (डोर्लेवाडी,पुणे),राघवेंद्र फर्टिलाइजर्स प्रा. लि.(कोल्हापूर),दिनकर पाटील(पाळे खुर्द,नाशिक),दादासाहेब शिंदे(सिंदोन,औरंगाबाद),जगन्नाथ घोडे(इगतपुरी,नाशिक),भगवान क्षिरसाग(बारामती,पुणे),चंद्रकांत पाटील(नरपड,पालघर),प्रवीण जाधव(भादवण,नाशिक), परमानंद खर्डे(रायतेवाडी,संगमनेर),संजय पवार(धुळे),शिवनाथ ठोंबरे(येवला),ग्यानमल जैन(कन्नड़),अनिल दादाजी पगार(कळवण),शितल कसबे(निमोण,अहमदनगर),बाळासाहेब जाधव(वडाळीभोई,चांदवड), विलास बगाटे(यशराज पार्क,पुणे), संजय खोडे,(पिंपळगाव बसवंत),माणिक देशपांडे(जामखेड,अ.नगर),सुरज आग्रे(श्रीगोंदा),जे.के. उद्योग समुह(सांगली),अलका शिंदे(सोनगाव,राहाता),उर्मिला पाटील(मौजे सांगाव,कोल्हापूर),अक्षय कृषी फार्म(निफाड,नाशिक),महादेव भांगे(माढा,सोलापूर),तुषार पाटील(दह्याने,नाशिक),सचिन इंगळे(यावल,जळगाव),रामचंद्र कारंडे(ग्रामविकास अधिकारी, पुणे),श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र( निफाड,नाशिक),
मुक्तानंद पाटील(नागद,औरंगाबाद),योगेश सुभाष पाटील(कळवण, नाशिक),सोमनाथ भिले(बारामती,पुणे),अशोक पाटील(दिंडोरी,नाशिक),मधुकर माळी(चाळीसगाव, जळगाव),सुधाकर पगार(कुंडाणे,नाशिक),लक्ष्मण शिंदे( दौंड,पुणे)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मालुंजकर यांनी, स्वागत गोपीनाथ लामखडे यांनी तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब मते, संदीप उफाडे, गोपीनाथ लामखडे, भगवान खरे, निवृत्ती न्याहारकर, मयुर गऊल, सविता जाधव, सुयोग जाधव यांनी परिश्रम घेतले.

Previous articleजय किसान फार्मर्स फोरमचे ‘कृषिरत्न’ पुरस्कार राज्यातील ४० शेतकऱ्यांना जाहीर* *२७ डिसें.ला नाशिकमध्ये सपत्निक सन्मान” नाशिक-
Next articleएक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी घुगे यांना अटक..!