Home Breaking News शेगाव पंचायत समिती याची घरकुल योजने मधे अफरातफर माटरगाव येथील गोविंदा वाघ...

शेगाव पंचायत समिती याची घरकुल योजने मधे अफरातफर माटरगाव येथील गोविंदा वाघ यांचा आरोप

संदिप देवचे ग्रामिण प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत प्रपत्र ड अन्वेय ज्या लोकांना स्वतःची घरे नाहीत तसेच भूमीहीन आहेत अशा नागरिकांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना घरकुल देण्याची योजना शासनाने आणलेली आहे. परंतु कायद्याचे रक्षक भक्षक बनल्याने सामान्य नागरिकांची दमदाटी होत असल्याचे प्रकार समोर येत आहे . तशीच दमदाटी माटरगाव खुर्द येथील सचिवांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील मूळ क्रमांक बदलून चुकीची यादी तयार करत ग्रामसेवकांनी आपल्या घरापासून वंचित ठेवल्याचा आरोप माटरगाव खुर्द येथील लाभार्थी रहिवाशी गोविंदा सूर्यभान वाघ यांनी केली आहे मला राहायला घर नाही मी लोकांच्या घरात भाड्याने राहतो स्वतःची शेती सुद्धा नाही शेतमजुरी करून मी माझा उदरनिर्वाह करतो घरकुल अपात्र यादी चा निकषा नुसार मी घरकुल योजनेसाठी पात्र असून सुद्धा मला घरकुल मिळाले नाही. मला जाणीवपूर्वक सचिवाकडून डावलण्याचा प्रयत्न होत आहे 29 डिसेंबर 2022 रोजी मूळ यादीमध्ये माझे नाव पाचव्या क्रमांकावर होते. परंतु ग्रामसेवक अनिल बिचकले यांनी मूळव्याधीमध्ये फेरबदल करून माझे नाव 59 या नंबर वर टाकले ग्रामपंचायत ने आवास योजनेच्या याद्या तयार करताना ग्रामसभेची कार्यवाही व्यापक प्रमाणात प्रसिद्ध न देता फक्त कागदोपत्री सभा दाखवून यादी मंजुरात घेतली आहे . शासन निर्णय 2008 ते 2011 मधील सूचनेचे पालन न करता ग्रामपंचायत ने यादीत पूर्ण बदल केला आहे सचिव कायदेशीर सल्लागार असतात परंतु त्याच सचिवाने बेकायदेशीर काम केले आहे

Previous articleलाल कांद्याचे घसरलेले दर व शेतकऱ्यांना वीज, कर्ज आदी प्रश्नांबाबत स्वराज्य संघटना
Next article*युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा*