Home Breaking News राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ढगे सहपरीवारचा गौरव!

राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ढगे सहपरीवारचा गौरव!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 डिसेंबर 2022

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर मार्फत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून मा. कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, मा. संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक देशमुख सहयोग अधिष्ठाता पशुवैद्यक महाविद्यालय परभणी, डॉ. रुपेश वाघमारे यांच्या हस्ते श्री सदानंद गणपतराव ढगे व श्यामसुंदर गणपतराव ढगे यांचा सहपरिवार गौरवपत्र व मानचिन्ह देऊन कुक्कट व मांस प्रकिया उद्योगात उत्पादन ते थेट विक्री या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त गौरव करण्यात आला. याबाबत हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी श्री दिलीप जाधव साहेब आणि सर्व कृषि कर्मचारी, शेतकरी बांधवांनी ढगे सहपरीवारचे अभिनंदन केले आहे.

Previous articleफोटोग्राफर चा प्रमानिकपणा एक तोळा सोन्याचे गंठण रोख सहा हजार रुपये सापडलेले केले परत
Next articleसिलोड जिल्हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.