Home Breaking News शेतकरी शेतमजुरांचा हिमायतनगर तहसीलवर मोर्चा धडकला..

शेतकरी शेतमजुरांचा हिमायतनगर तहसीलवर मोर्चा धडकला..

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने….

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/ केंद्रीय कामगार व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्या संदर्भात तहसिल कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला असून शासनाचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
केंद्रीय कामगार व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने मोदी सरकारच्या किसान कामगार व जनविरोधी धर्मांद महागाई बेरोजगारी विरोधात दि. 16 फेब्रुवारी रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होऊन स्थानिक मागण्या घेऊन किसान कामगारांचा मोर्चा शुक्रवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चात असंख्य महिला पुरुषांनी सहभागी झाल्या होत्या. या मोर्चातील मागण्या हिमायतनगर तालुका दुष्काळ जाहीर करा, msp कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा, व हमीभावाने माल खरेदी करा, शहरातील कामगारांना नगरपंचायत स्थापनेपासून रोजगार हमी जाबकार्ड नसल्यामुळे मजुरांना काम मिळत नाही त्यांना तात्काळ जाबकार्ड तयार करून देण्यात यावेत यासह अनेक मागण्या संदर्भात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी काॅ विजय गाभणे, काॅ दिगंबर काळे, काॅ दिलीप पोतरे,काॅ विष्णू मिराशे,कांताबाई बनसोडे, यांच्या सह अनेक महिला पुरुषांची उपस्थिती होती.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आर्यन्स ग्रुप तर्फे भव्य मॅरेथॉनचे आयोजन,
Next articleआमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !