Home Breaking News आमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !

आमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -20 फेब्रुवारी 2024

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा
हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधान सभेचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर ही भाजपातच जाणार अशी चर्चा खुप जोरात चालु आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर आजतागायत सध्यातरी मी काँग्रेस सोबतच आहे. असे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगीतले आहे. परंतू राजकारणात, प्रेमात, युध्दात केव्हाही, कधीही काहीही होवू शकते. असे अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणात दिसुन आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आता भारतीय जनता पार्टीत गेले आहेत. त्याअनुशंगाने हदगांव -हिमायतनगर तालुक्यातील जनतेत सद्य स्थितीत संमर्भ निर्माण होत आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे काही दिवसाच्या अंतराने भाजपात प्रवेश करतील. अशी चर्चा या दोन्ही तालुक्यात रंगू लागली आहे. तसे झाल्यास शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अडचणीत जोरदार पणे होवू लागली असून, लोकसभेच्या निवडणूका ह्या एप्रिल मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणी लोक सभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान सभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला पुरेसा शिल्लक असून, सत्तेची समीकरणे जुळविण्यात कोण यशस्वी ठरतो हे पाहण्यासाठी आणखीन तिन महिणे वाट पहावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित.

शेवटी जनतेच्या मनातील प्रश्न भाजप, काॅग्रेस ( कोणतीही असो), शिवसेना ( कोणतीही असो), राष्ट्रवादी काँग्रेस ( कोणतीही असो)…या सर्वच पक्षातील जनतेच्या मनावर सध्या … प्रश्न कोणता झेंडा घेऊ मी हाती…..

Previous articleशेतकरी शेतमजुरांचा हिमायतनगर तहसीलवर मोर्चा धडकला..
Next articleविश्वशांती बुध्द विहार वाडेगाव येथे शिवजयंती साजरी.