Home Breaking News संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 जानेवारी 2026

अंगणवाडीच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

हिमायतनगर तालुक्यातील



मौजे निरंजनी येथे समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिरंजनी गावात स्वच्छता चळवळ अधिक बळकट व्हावी या उद्देशाने गावातील महिलांना स्वच्छतेचा वाण म्हणून कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मेघा पवन करेवाड या होत्या. पंचायत समिती हिमायतनगरचे विस्तार अधिकारी श्री. सुशीलकुमारजी शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक श्री. विजय जंगीलवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती क्षीरसागर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात समूह आरोग्य अधिकारी डॉ. श्री. प्रतापजी प्रभनकर यांनी महिलांना स्वच्छता, आरोग्य व आजार प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री. पवन करेवाड यांनी केले. त्यांनी सांगितले की, स्वच्छता शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले असून, श्रमदानातून राबविण्यात आलेला ग्रामस्वच्छता उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. तसेच मागील पाच वर्षांत गावात सुमारे २.५ किलोमीटर बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी यू. जे. पठाण मॅडम यांनी केले.

या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होऊन, गाव स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने प्रभावी पाऊल उचलले गेले असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सिरंजनी येथील नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले

Previous articleवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
Next articleजलंब गावातील अपंग कार्यकर्त्याने स्वखर्चाने रोषणाई केली; गावकऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना मिळणार फायदा