Home Breaking News फोटोग्राफर चा प्रमानिकपणा एक तोळा सोन्याचे गंठण रोख सहा हजार रुपये सापडलेले...

फोटोग्राफर चा प्रमानिकपणा एक तोळा सोन्याचे गंठण रोख सहा हजार रुपये सापडलेले केले परत

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी

भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या ओंकार फोटो स्टूडीओ समोर मंगरूळ येथील दोन बहिणी बसल्या होत्या त्यांच्या जवळील पर्स बसल्या ठिकाणी अचानक पडली त्या पर्स मध्ये एक तोळा सोन्याचे गंठण चाळीस मनी असलेले गंठण आणि, रोख सहा हजार रुपये असे होते फोटोग्राफर यांना सापडताच त्यांचा शोध घेऊन परत केल्याने फोटोग्राफर च्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील पदमीनाबाई मारोती पांचाळ,रेखा मारोती पांचाळ या दोघी बहिणी शुक्रवारी शहरात काही कामानिमित्त आल्या होत्या. भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या बोंपीलवार यांच्या ओंकार फोटो च्या दुकान समोर बसलेल्या एका बहिणी जवळ असलेल्या पर्स मध्ये दोघींचे मिळून सहा हजार रुपये आणि एक तोळ्याचे असलेले गंठण ठेवून असलेली पर्स बसल्या जागेवर विसरल्या .याच वेळेस फोटोग्राफर दत्ता पूपलवाड, श्रीनिवास बोंपीलवार यांनी सदरील दुकान बाहेर पडलेली पर्स उचलली यामध्ये सहा हजार रुपये आणि गंठण आढळून आले. या ठिकाणी बसलेल्या महिलांचा शोध सोपान बोंपीलवार यांनी मंगरूळ येथील शिवदास विठ्ठल पेंटेवाड यांना संपर्क केला असता घाबरून गेलेल्या दोघी बहिणी धावा धाव करीत पर्स सापडत होत्या परंतु हि पर्स ओंकार फोटो च्या दुकानात असल्याचे सांगितले असता त्या दोघी बहिणी सह त्यांच्या नातेवाईकांनी दूकानला भेट दिली. यावेळी फोटोग्राफर श्रीनिवास बोंपीलवार, पत्रकार दत्ता पुलवाड यांनी ति पर्स व त्यातील पैसे त्यांना परत करून आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे. पर्स मिळाल्यानंतर दोघी बहिणींची आनंद मावेनासा झाल्याचे पहावयास मिळाले त्या फोटोग्राफर दत्ता पूपलवाड, श्रीनिवास बोंपीलवार यांच्या प्रामाणिक पणाबद्दल यावेळी उपस्थित असलेले सरपंच मारोती वाडेकर, गजानन कदम पाटील,ग्रामसेवक नारायण काळे, सोपान बोंपीलवार, शिवदास विठ्ठल पेंटेवाड,आनंद रासमवाड, शिवाजी एटलेवाड, वैजनाथ no एमजलवाड, राजीव एटलेवाड, यांनी कौतुक केले.

Previous articleहिवरा आश्रम कर्णबधिर विद्यालय चार दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड…
Next articleराष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ढगे सहपरीवारचा गौरव!