Home Breaking News हिवरा आश्रम कर्णबधिर विद्यालय चार दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड…

हिवरा आश्रम कर्णबधिर विद्यालय चार दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड…

प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांचा जिल्हास्तरीय सत्कार..!

शितल शेगोकार प्रतिनिधी 

( 23 डिसेंबर) सामाजिक न्याय विभाग म. शा. समाज कल्याण विभाग परिषद जि.प.बुलढाणा यांचे वतीने जिल्ह्यातील दिव्यांग शाळा स्तरावरील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा समाज कल्याण जिल्हा परिषद बुलढाणा आणि आनंद स्वामी शिक्षण संस्था देऊळगाव मही यांचे संयुक्त विद्यमाने दे. मही येथे 22 डिसेंबर 2022 ला आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घघाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत साहेब शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शीलाताई आरमाळ ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती नंदुभाऊ शिंगणे, वैसाका माधुरी भागवत ,सवैसाका शालिग्राम पुंड, केंद्रप्रमुख बुरकुल सर, व संस्थेचे सचिव सुनील आरमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विवेकानंद निवासी कर्णबधिर विद्यालय हिवरा आश्रम येथील कर्णबधिर क्रीडा प्रवर्गात चार दिव्यांग विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने स्पर्धेत विजयी झाले .यामध्ये वयोगट 8 ते 12 मध्ये विककी विष्णू इंगळे, 12 ते 16 धावण्यामध्ये गणेश राजेश डोळे ,आणि मुलीच्या गटात कु.वैष्णवी खंडारे तर गोळा फेक स्पर्धेत विशाल विष्णू बोडके इत्यादी विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रथम आले आहेत .सदर विद्यार्थ्यांची तयारी क्रीडा शिक्षक विवेक दळवी सहाय्यक शिक्षक संदीप लद्धड व सर्व शिक्षक वृंदांनी करून घेतली. मुलीसोबत सौ भाग्यवंती जाधव होत्या .

निवड झालेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते,
सचिव संतोष गोरे आणि प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके विवेकानंद आश्रम परिवारातून सर्वांनी मुलांचे अभिनंदन केले आहे .क्रीडा स्पर्धा जिल्हा समाज कार्यालय बुलडाणा वआनंद स्वामी शिक्षण संस्था देऊळगाव मही च्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर झनक,अपंग विद्यालय मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, जिजामाता मूकबधिर विद्यालय मुख्याध्यापक अनिल आरमाळ व त्यांचे शिक्षक यांनी सुनियोजित पणे आयोजित केल्या.
प्राचार्य डॉक्टर पंढरीनाथ शेळके यांचा जिल्हास्तरीय सत्कार

विवेकानंद निवासी कर्णबधिर विद्यालय हिवरा आश्रमचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके हे दिव्यांग शैक्षणीक कार्यात. कार्यरतआहेत. या.सोबत सामाजिक राष्ट्रीय सेवा कार्यात सतत सहभागी असतात.सामूहिक विवाह,व्यसनमुक्ती कार्य,कोरोना काळात कोरोना योध्दा, राष्ट्रीय एकात्मता,साहित्य,काव्य इत्यादी क्षेत्रात सहभागी असतात .
डॉ.शेळके सर याना 2022 मध्ये. सामाजिक कार्यासाठी आंतर राष्ट्रीय कॉमन वेल्थ विद्यापीठ टोंगा देशाकडून मानद पी. एच. डी. (सोशल वर्क) साठी दिल्ली येथे २७आगस्त ला प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना 2022चा पुणे येथील निती आयोग व भारत सरकार मान्यताप्राप्त मणिभाई मानव सेवा ट्रस्ट यांचे वतीने भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याबद्दल दिव्यांग विभागाच्या वतीने क्रीडा आयोजन समितीने शाल,गुच्छ,व शीव-जिजाऊ प्रतिमा देवून सत्कार जिल्ह्याच्या सर्वांच्या वतीने प्राचार्य अनिल आरमाळ यांनी केला..यावेळी मंचावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत साहेब व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसंभापूर येथील ग्रामपंचायतचे सदस्य,आणि त्यांच्या नातेवाईकांनाच घरकुल योजनेचा लाभ…!!
Next articleफोटोग्राफर चा प्रमानिकपणा एक तोळा सोन्याचे गंठण रोख सहा हजार रुपये सापडलेले केले परत