Home Breaking News छत्रपती शिवरायांवर स्वराज्य संस्कार राजमाता जिजाऊंचाच : गौतम पगारे

छत्रपती शिवरायांवर स्वराज्य संस्कार राजमाता जिजाऊंचाच : गौतम पगारे

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर.-8983319070

येवला (प्रतिनिधी)
राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्य,शील, मानवतावादी,वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष,स्वराज्य संस्कारातून छत्रपती शिवराय घडले,अवघ्या सोळाव्या वर्षात बाल शिवाजीच्या मन,मनगट,मेंदूची घडण जिजाऊ माँ साहेबांनी केली याचा आदर्श आजच्या माता भगिनींनी घेणे गरजेचे असून सोळाव वरीस धोक्याचं नाही तर मोक्याच असतं हे माँ जिजाऊने ओळखलं होतं,शिवरायांवर स्वराज्य संस्कार त्यानीच केले असे उदगार येथे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती अभिवादन कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गौतमभाऊ पगारे यांनी व्यक्त केले.
सुरेश खळे,दिलीप मोहरे,महेंद्र पगारे आदी मान्यवर ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित भांबारे तर सूत्रसंचालन राजरत्न वाहूळ यांनी केले.
साहिल जाधव ,रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.

Previous articleहिंगोली नांदेडसह – यवतमाळ जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मान्यता
Next articleकारला येथे राजा भगीरथ जयंती निमित्त ह. भ.प.नरसिंग महाराज यांची किर्तन सोहळा…