Home Breaking News कारला येथे राजा भगीरथ जयंती निमित्त ह. भ.प.नरसिंग महाराज यांची किर्तन सोहळा…

कारला येथे राजा भगीरथ जयंती निमित्त ह. भ.प.नरसिंग महाराज यांची किर्तन सोहळा…

भुमीराजा न्युज जण सामान्यांचा बुलंद आवाज

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/

राजा भगीरथ यांच्या जयंती सोहळ्याचे 14 जानेवारी रोजी कारला येथे भव्य आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने किर्तन सेवा होणार आहे. या किर्तन सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात कारला येथे राजा भगीरथ यांचे मंदिर व राजा भगीरथ यांची मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी राजा भगीरथ यांची जयंती समाज बांधवांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.दि.14 जानेवारी रोजी सकाळी राजा भगीरथ यांच्या मुर्तीची पुजा करून सकाळी 11 ते 1 ह.भ.प.नरसिंग महाराज केरूळकर यांच्या किर्तन सेवा होणार आहे. या जयंती सोहळ्यासह किर्तन सेवेचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजा भगीरथ देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Previous articleछत्रपती शिवरायांवर स्वराज्य संस्कार राजमाता जिजाऊंचाच : गौतम पगारे
Next articleक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय , देगांव येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती संपन्न