Home कृषीजागर प्रतिक्षा पावसाची !

प्रतिक्षा पावसाची !

👉 शेतीशिवार

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
नांदेड जिल्हा संपादक
दिनांक- 11 जुन 2022

मृग नक्षत्र म्हणजे शेतकरी राजांचे खरीप हंगामातील महत्वाचे नक्षत्र..
पेरणीपूर्व मशागत पुर्ण करून शेतक-यांनी काळया आईची सेवा करत, हवामान अंदाज यावर्षी अनुकूल दाखविल्यामुळे, पाऊस लवकर पडेल अशी आशा आहे.
जिकडे पाहावे तिकडे काळीभोर जमिनीचे पट्टे पेरणीसाठी सज्ज आहेत. फक्त प्रतिक्षा आहे लवकर पाऊस पडण्याची. महागडे बि- बियाणे, खते अशा अनेक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठाची शेतकऱ्यांनी खरेदी केली. चातक पक्षाप्रमाणे शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. शेतातील काडीकचरा वेचून सर्व शेतकरी आपले शेत स्वच्छ करीत आहेत.
काळी आई थंडगार पावसामुळे तृप्त होऊन, हिरवागार शालू परिधान करायला जणु तयारच आहे. असे चित्र आहे.
” पेरते व्हा पेरते व्हा” असा संदेश पाखरांचा संदेश ऐकु येत आहे.
धावपळ धावपळ करत बळीराजाने शेतीसाठी येत्या खरीप हंगामात पुन्हा बळीराजा कंबर कसुन, आपले नशीब आजमावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Previous articleविजाच्या कडकड्यासह मुसळधार पावसात,दुधड येथे वीज पडून बैलाचा मृत्यू .
Next articleपुरेसा पाऊस पडल्याशिवाय खरीप पेरणीची घाई करू नये.