Home Breaking News महाराष्ट्र दिनानिमित्त गोपतवाड यांचा सत्कार संपन्न.

महाराष्ट्र दिनानिमित्त गोपतवाड यांचा सत्कार संपन्न.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 01 मे 2023

हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, सवना नगरीचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष,चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार, मा सभापती परमेश्वर गोपतवाड यांचा सवना ग्रामस्थांनी महाराष्ट्र दिनी शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मतदारांनी दाखविलेल्या विशवासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यापुर्वीही तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे व जनतेच्या आशीर्वादने पाच वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. आणि आता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार, लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुन्हा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली. या संधीचे सोने सवनेकरांच्या आशीर्वादमुळे नक्कीच करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपसरपंच सोनबा राऊत, पोलीस पाटील गणपत पाटील गोपेवाड, मु.अ. बोडावार मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा अनगुलवार, मा. सरपंच सिध्दार्थ राऊत, सदस्य संदीप बिरकलवार, संचालक माधवराव बिरकलवार सर, संचालक गणपत राऊत, भिमराव दादा राऊत, सदस्य लक्ष्मण राऊत, माजी उपसरपंच परमेश्वर संगनवाड, रामु वछेवार, दत्ता काळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सर्व संचालक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व सवना ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Previous articleसाहित्यधारा ब. उ. सेवाभावी संस्था, औरंगाबाद चे वतीने
Next articleशिकाऊ उमेदवारांच्या स्टायपेंडचा भार प्रवासी उत्पन्नावर एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते.