Home Breaking News हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे नेते “गंगाधर पाटील चाभरेकर” यांचा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी.आर...

हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे नेते “गंगाधर पाटील चाभरेकर” यांचा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश…..

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हदगाव – हिमायतनगर मतदारसंघातून कोंग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतांना जनतेची कामे प्रामाणिकपणे केले असल्याने 2019 ची विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी आसा आग्रह  गंगाधर पाटील चाभरेकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या कडे धरला परंतु हदगाव – हिमायतनगर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे रनिंग आमदार असल्याने त्यांना च पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पण आपली उमेदवारी डावल्याचा राग मनात धरत गंगाधर पाटील चाभरेकर यांनी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सहकार्याने मातोश्रीवर जाऊन शिव बंधन बांधून शिव सेनेत प्रवेश केला व नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पण मध्येच बाबुराव पाटील कोहळीकर यांनी ऐनवेळी चौकार मारून मा. आ. नागेश पाटील आष्टीकर यांची विकेट पाडली व विधानसभेच्या आमदार पदी माधवराव पाटील जवळगावकरांनी बाजी मारली भा. ज. प. -बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून  बाबुराव कदम कोहळीकर, कोंग्रेस पक्षाकडून आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून . नागेश पाटील आष्टीकर, हे सक्षम व तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतांना आपला निभाव लागणार नाही पण मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आपली चांगली ओळख निर्माण केली असल्याने व विधानसभेत तुल्यबळ आशी लढत देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करुन येथील तिन्हीही मातब्बरांना धक्का दिला असल्याचे दिसून येते. या आधी विधानसभेची निवडणूक हि तिरंगी होणार आशी चर्चा सुरू होती पण आता या राजकीय भूकंपाने ही निवडणूक चौरंगी होणार हे मात्र स्पष्ट झाले.

Previous articleअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ; तहसीलदारांना निवेदन
Next articleपत्रकारांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांना निलंबित करा