Home Breaking News हिमायतनगर शहरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी पुकारला तीन दिवस बंद….. 👉🏻बंद मुळे रब्बी...

हिमायतनगर शहरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी पुकारला तीन दिवस बंद….. 👉🏻बंद मुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे हाल..

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/– शहरासह तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी प्रस्ताविक पाचही कायदे तात्काळ रद्द करण्यासाठी सरकारच्या विधेयकाचा जाहीर निषेध म्हणून दिनांक 2 नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत हिमायतनगर शहरासह संपूर्ण तालुक्यातील कृषी दुकाने बंद ठेवून ह्याचा जाहीर निषेध केला

शहरासह संपूर्ण तालुक्यातील कृषी दुकाने तीन दिवस बंद आहेत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील तुरीवर किटकनाशक फवारणी, हरभरा, गहु, बि बियाणे,खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे. तीन दिवस कृषी दुकाने कड कडीत बंद ठेवल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांना हिमायतनगर तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडील पाच विधेयक तात्काळ रद्द करण्यासाठी निषेध म्हणून शहरसह तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रबंद ठेवण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कृषी निष्ठा खरेदी करून शेतकन्यांना सिलबंद पॅकींगमध्ये विक्री करताना दोषी ठरवू नये. योग्य विनीष्ठा विकणारे कृषी विनिष्ठ विक्रेत्यावर जरब बसविणारे शासनाचे जाचक कायदे लादू नये यासाठी हिमायतनगर शहरातील सर्व कृषी दुकाने बंद ठेवून सर्व कृषी दुकानदारांनी शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला… यावेळी शहरातील सर्व कृषी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous article@ भाकरी @
Next articleकाँग्रेस शिक्षक सेल अकोला तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न*