Home Breaking News @ निधनं वार्ता @

@ निधनं वार्ता @

रामकिशन पाटील बुध्देवार यांचे निधन.
बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बू.)येथील ज्येष्ठ नागरिक तथा सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन रामकिशन साहेबराव पाटील बुध्देवार वय (६०) यांचे आज दिनांक ३ रोजी दुपारी हद्द्यविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
रामकिशन पाटील बुध्देवार यांनी अनेक पद भुषविले होते. गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहीले. पेरकेवाड समाज बांधवांच्या सामाजिक प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. सध्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून होते. बिलोली तालुक्यात राजकीय पटलावर त्यांचा कायम दबदबा राहिला. ते साहेबराव पाटील बुध्देवार यांचे चिरंजीव होते.
रामकिशन पाटील बुध्देवार यांच्या पश्चात पत्नी, तिन मुलं, एक मुलगी सुना नातवंड असा मोठा परिवार आहे दिनांक ४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी बेळकोणी (बू.) ता. बिलोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामकिशन बुध्देवार यांच्या निधनामुळे हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.

Previous articleश्रीमती विद्या सुदेवाड यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान.
Next articleसंपत्तीच्या वादातून काका-काकूने पुतण्याला संपवलं, बायको येण्याआधी अंत्यसंस्काराची तयारी; असा खेळला खूनी खेळ