मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 8 मे 2026
हिमायतनगरच्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक काळात प्रभाग क्रमांक 8 मधील नव्याने आपले नशिब आजमावणारे शांत, संयमी नगरसेवक मिर्झा बेग यांनी मतदारांना पहिले आश्वासन देऊन आश्वाशित केले होते. पाणी टंचाई लक्षात घेता..मला तुम्ही आर्शिवाद द्या. तुम्हाला पहिल्यांदा वार्डातील पाणी टंचाई दुर करुन देतो…मतदारांनी नव्या दमाच्या नवतरुणाला संधी दिली आणी मिर्झा बेग हे नगरसेवक म्हणुन निवडुन आले..पण आपण निवडणुक काळात जनतेला दिलेले वचन पुर्ण करुन दाखविले…लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभाग क्रमांक आठमधील साडेतिन शे मारलेला बोअर रिबोअर करुन पाचशे फुटांपर्यंत केला…अन्..वार्डात पाणीच पाणी झाले..
नवनिर्वाचित नगरसेवक यांचे काम पाहुन सेवानिवृत्त मु.अ. नागनाथ राव अक्कलवाडसर, सुभाष माने, डाॅ. शिवाजी देवकते, मारोती अक्कलवाड,परमेश्वर सिंगणवाड, शैलेश , राम बंजेवाड आदिंनी नगरसेवक मिर्झा यांचे अभिनंदन केले आहे…



