Home Breaking News सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; वाडेगांव शहर भगवान बुद्ध यांची जयंती...

सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; वाडेगांव शहर भगवान बुद्ध यांची जयंती साजरी

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी भूमीराजा

वाडेगांव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश, मैत्रीभावनेची जोपासना आणि ‘सब का मंगल हो’च्या जयघोषात सामूहिक त्रिशरण पंचशील व सूत्रपठण ग्रहण करीत तथागत बुद्ध यांना वंदन करण्यात आले.

भगवंताला वंदन करण्यासाठी वाडेगांव शहरातील अशोक नगर भीमनगर जयभीमनगर पंचशीलनगर सिद्धांथ नगर अनुयायांची गर्दी उसळली होती. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त वाडेगांव शहरासह जिल्ह्यातील गावागावांतील बुद्धविहारांमध्ये आयोजित कार्यक्रमांत तथागत बुद्ध यांच्या प्रतिमा व पुतळ्यासमोर दीपप्रज्वलन आणि पुष्प अर्पण करीत सामूहिक त्रिशरण पंचशील बुद्धपूजा, बुद्धवंदना, आशीर्वाद गाथा असे सूत्रपठण ग्रहण करण्यात आले. त्यामध्ये ‘सर्वांचे मंगल हो’ अशी मंगल कामना करीत तथागताला वंदन करण्यात आले.

Previous articleसोनारी फाटा टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्याने 4 विद्यार्थिनी जखमी…
Next articleहिमायतनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाजी महाजन यांची धर्माबाद येथे बदली.