Home Breaking News आमदार माधवराव पाटील जवळगावकर सारखा लोकनेता आपलाला मिळाला!

आमदार माधवराव पाटील जवळगावकर सारखा लोकनेता आपलाला मिळाला!

👉 चर्चा जनतेची….

मारोती अक्कलवाड पा. पाटील
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 13 हे 2023

नांदेड जिल्ह्यात नुकत्याच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकणुका पार पडल्या. सर्वच पक्षांनी जोर लावला होता. त्यात सर्वाधिक काॅग्रेस पाच पैकी चार बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यांचे श्रेय मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना जाते. त्याबरोबर हिमायतनगर तालुक्याची कृषि उत्पन्न बाजार समितीवर लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी १८ पैकी १८ जागेवर उमेदवार उभे करून भरघोष मतांनी निवडून आणले आहेत. म्हणुनच आजतागायत विधानसभा मतदारसंघात जवळगांवकर यांची पकड घट्ट आहे. त्यांचा असलेला जनसामान्य माणसाशी दाडंगा संपर्क, आपुलकीने सुखदुःखात नेहमी सहभागी होणे, लग्न असो ईतर समारंभात वेळ काढून उपस्थित राहणे. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न वरीष्ठ पातळीवर पोहचविणे. आणि ते प्रश्न पुर्णपणे निकाली काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे. यामुळे लग्नसोहळयात उपस्थित लोकांमध्ये एकच चर्चा होतांना दिसत आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांसारखा लोकनेता आपल्या तालुक्याला लाभला आहे..

Previous articleपोलिस अधिक्षक मा. सुनील कडासने साहेब ” समाज भूषण पुरस्काराने ” सन्मानित. – डॉ. संघर्ष सावळे
Next article*कविता*