Home Breaking News राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा अहिल्याघाट, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे होणार साजरा

राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा अहिल्याघाट, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे होणार साजरा

हिंदु धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ क़र सोहळा समिती आयोजित

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -:8983319070

हिंदु धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर आपल्या कार्याची ओळख निर्माण करुन आज संपूर्ण भारतात धार्मिक ठिकाणी तसेच नदीकाठी, मंदिरे, धर्मशाळा, बारव, जनावरां साठी पानवठे, तयार केले. जाण्या – येण्यासाठी रस्ते तयार केले. तसेच इंदौर सारख्या ठिकाणी राजधानी वसवून संपूर्ण मावळ प्रांताचा कारभार चाल वला. तसेच नर्भदेच्या ती रावर महेश्वर या ठिकाणी घाट बांधून मंदिरे बांधली. व वस्रोदयोग केंद्र स्थापन केली. त्यांतून हजारों महिलांना रोजगार उत्पन्न करुन दिला. ज्या अहिल्या मातेने संपूर्ण हिंदू धर्मा साठी कार्य केले त्यामध्ये बारा ज्योतिलिंग जीर्णोद्धार करणे, सप्तपूरी चार धाम या ठिकाणी मंदिरे घाट बांधुन एक आदर्श महिला शासक म्हणून आज संपूर्ण भारतभर नावलौकीक केले. त्या मातेचा जन्मदिन येत्या 31 मे रोजी नाशिक जिल्हयांतील शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र साजरा व्हावा व त्या मातेला नमन करावे.
31 मे व 1 जून 2023 रोजी सायं.6:30 वा. अहिल्याघाट, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जन्मोत्सव सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.31 मे रोजी सायं.7:00 वाजता अहिल्या आरती व गोदा महाआरतीचे नियोजन केले आहे.298 व्या जन्म सोहळ्या निमित्त 298 विवाहित जोड़प्यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती म्हणून महाराजा यशवंतराव होळकर राजे ( होळकर शाही राजघराणे, इंदौर )मा. अमरजितदादा बारग़ळ ( त ळेादा संस्थान ) मा. स्वप्निल राजे होळकर ( इंदोर संस्थान ) मा. सुधीर भाऊ देडगे )(इंदौर ) मा. लक्मण नजन ( व्याख्याते ) मा. रामभाऊ लांडे, ( होळकर शाही इतिहासकार ) मा. श्री रामदास काळे ( होळकर शाही अभ्यासक )व नाशिक जिल्हयातील पुरोहित महासंघ, साधु संत, महात्मे यांच्या हस्ते महाआरतीचे व व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच 31 मे रोजी सायंकाळी आरती साठी आलेल्या सर्व भाविकांना राजमाता अहिल्यादेवीचा फोटो भेट देण्यात येणार आहे.
तसेच 1जून रोजी सायंकाळी यशवंत पटांगणावर अहिल्या जन्मोत्सव निमित्त सांसंस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, मार्गदर्शन होणार आहे. त्यां निमित्त नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री मा.भारतीताई पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. श्री. कोंडाजी मामा आव्हाड यांसह नाशिक शहरांतील व जिल्हयांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित रहाणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ” अहिल्यादेवी होळकर ” या चित्रपटाची संपूर्ण टीम दिग्दर्शका सह उपस्तिथ रहाणार आहे असे सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. समाधान बागल यांनी सांगितले आहे.
तरी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी व समाज बांधवांनी या सोहळ्यांस उपस्थित राहून या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर सार्वजनिक सोहळा समितीचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत शिंदे यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया :-समाधान बागल
( संस्थापक अध्यक्ष )
जन्मोत्सव सोहळा समिती

हिंदु धर्म रक्षक व हिंदुस्थानची आदर्श महिला शासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत् सव सोहळा आम्ही नियोजन समिति सालाबादा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. त्या निमित्त 31 मे व 1 जून रोजी रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे साजरा करीत आहोत. ज्या अहिल्या मातेने संपूर्ण हिंदू धर्मा साठी कार्य केल, त्या मातेला एखाद्या समजाच्या चैाकटीत अड़कवून ठेवणे योग्य नाही त्यामुळे सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी या सोहळ्या स उपस्तिथ राहुन या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे अशी विनंती करतो.

Previous articleयुनिट वापर ११ बिल मात्र१२४० रुपये वीज ग्राहक त्रस्त, विध्युत महामंडळचा अजब कारभार
Next articleश्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज वाडेगावात आगमन