Home Breaking News युनिट वापर ११ बिल मात्र१२४० रुपये वीज ग्राहक त्रस्त, विध्युत महामंडळचा...

युनिट वापर ११ बिल मात्र१२४० रुपये वीज ग्राहक त्रस्त, विध्युत महामंडळचा अजब कारभार

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील वाडेगाव वीज वितरण कार्यालय अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव मध्ये वीजग्राकांचा वापर११ बिल मात्र इतर चार्जेस सह १२४० रुपये आल्याचं समस्यां लोकमत कडे वीज ग्राहक असलेल्या नारायण सोनोने यांनी सांगितलं आहे.
नारायण सोनोने यांचा मीटर क्रमांक ०७६११९२८४१८ नंबर मध्ये मागील रिडींग २९५४ ,चालू रिडींग २९६५ असून युनिट वीज वापर ११ दिसत आहे बिल मात्र १२४० आहे.त्यामुळे वीज ग्राहक पूर्ण संकटात सापडला आहे.असे अनेक ग्राहक जास्त वापराचे बिल असल्याचे वीज ग्राहकाकडून सांगण्यात येते.परंतु गंभीर प्रकार कडे वरिष्ठ चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वीज ग्राहकाकडून होत आहे.काही वीज ग्राहकांना अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा याकडे काळजीपूर्वक लक्ष देत नसल्याचे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.तसेच वीज मीटर घेताना सुद्धा काळजी पूर्वक न घेता काहीही टाकत असल्याचे तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.परंतु याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने काही वीज ग्राहक शांततेत भरून मोकळे होतात.या गँभिर प्रकाराकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करण्यात यावी जनेकरून सामान्य माणसाला आर्थिक झळ पोहचणार नाही..अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे..

युनिट वापर 11.इतर चार्जेसह बिल आलं बाराशे 40.. कसं करा व सामान्य माणसाने असे बिल आले तर याबाबत खिशाला न परवडणारे बिल येत असल्याने आर्थिक झळ पोहचत आहे.

नारायण सोनोने
वीज ग्राहक वाडेगाव…

Previous articleपातुर कृषी उत्पन्न बाजार समिती वंचित बहुजन आघाडीचे राजेश महल्ले यांची उपसभापती म्हणून अविरोध निवड
Next articleराजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा अहिल्याघाट, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे होणार साजरा