Home Breaking News *बाळापूर शिवसेना(शिंदे गट)यांच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन*

*बाळापूर शिवसेना(शिंदे गट)यांच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन*

कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतिनिधि

दि.25/9/2022

बाळापूर-येणाऱ्या आगामी नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने आज बाळापूर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले बाळापूरची ग्राम देवता आई बळादेवी मंदिरात जाण्यासाठी भाविकांना त्रास होतो मंदिरात जाण्याच्या मार्गात काही व्यापाऱ्यांचे मार्गात अतिक्रमण आहे त्यामुळे ट्राफिक च्या समस्या निर्माण होतात आई बाळादेवी मातेच्या दर्शनाला लहान मुले महिला ये जा करतात बाळादेवी रोड, ते तहसील रोड, जैन मंदिर ते तहसील रोड, अकोला नाका ते बाजार परीसर तसेच औरंपुरा येथून महिला वर्ग सकाळी ५ते रात्री १० वाजेपर्यंत बाळादेवी मंदिरात दर्शना करिता येतात त्या करिता बाजार परिसरात पोलीस बंदोबस्त तसेच मुख्य चौकात पोलीस रावटी व मन व महेश नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्ये पोलिस रावटी देण्यात यावी तसेच मन नदीच्या पुलावर रिकामे लोक बसलेले आसतात त्यांना बसण्यास मनाई करून तेथे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा तसेच रात्रीच्या आरतीच्या वेळेस जैन मंदिर ते बाळादेवी मंदिर या रोडवर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा व बाजार परिसर व तहसील रोड वरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवावे व डॉ बुलबुले यांच्या दवाखान्या समोर असलेले आटो हटविण्याकरिता आज बाळापूर शिवसेना(शिंदे गट)यांच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी युवसेना जिल्हा समन्वयक रितेश शेलार,शिवसेना तालुका सचिव श्याम बहुरूपे,शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा घाटोळ, युवासेना उपतालुकाप्रमुख मंगलसिंह ठाकूर,शिवसेना शहरप्रमुख शुभम जोध,युवासेना शहरप्रमुख स्वप्नील वडतकर,शिवसेना उपशहरप्रमुख गणेश भुरेवाले,उपशहरप्रमुख लक्ष्मण चवरिया,उपशहरप्रमुख प्रितेश धनोकार, उपशहरप्रमुख विकास रोम,युवासेना उपशहरप्रमुख प्रशांत भोसले,उपशहरप्रमुख हरिनाथ विधाते,उपशहरप्रमुख शिवा गवई, उपशहरप्रमुख विठ्ठल शेलार ,गजानन जामोदे,गौरव शामलाल अहिर उपस्थित होते व निवेदनावर आदी कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या.

Previous article*नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*
Next article*जनावरांचे लंपी रोगाचे लसीकरण हिमायनगर तालुक्यातले खडकी (बाजार)*