Home Breaking News बेलुरा गावच्या रस्त्यासाठी बसपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..

बेलुरा गावच्या रस्त्यासाठी बसपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क

खामगाव:- तालुक्यातील बेलुरा गावातील 11 तरुण युवकांनी गेल्या 4 दिवसांपासून एस.डी.ओ. कार्यालय खामगांव यांचे समोर गावचा रस्ता निर्माण करणे हेतु आमरण उपोषणाची दखल घेऊन रस्ता निर्माण करणेकरीता शासकीय स्तरावरुन निर्णय घेणेबाबत बसपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की उपरोक्त विषयाचे संदर्भात आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी लेखी निवेदन देतो की, गेल्या 75 वर्षापासुन गटग्रामपंचायत हिवरा बु. अतंर्गत बेलुरा गावात येण्या जाण्यासाठी रस्ता नाही. अनेक वर्षापासुन नागरीकांनी जबाबदार शासकीय अधिका-यांकडे ब-याच वेळा अर्ज केलेत. तसेच शिष्टमंडळ सुध्दा येऊन एस.डी.ओ खामगांव, तहसिलदार खामगांव यांना भेटुन चर्चा केली. परंतु आजतागायत बेलुरा गावाला रस्ता नाही. गावातील वृध्द नागरीक, तसेच शाळकरी मुले, महिला येण्या जाण्यासाठी पावसाळयाचे दिवसात खुप मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळयाचे दिवसात या समस्यामुळे नागरीक त्रस्त होतात.
तहसिलदार, एस.डी.ओ. खामगांव यांना अनेकवेळा तक्रार / निवेदन सादर करुनही आजतागायत रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे गावातील नागरीक त्रस्त होऊन गेल्या 4 दिवसापासुन एस.डी.ओ. कार्यालय खामगांव येथे आमरण उपोषण करत आहेत. या 4 दिवसातही कुठल्याच प्रकारचा निर्णय आजतागायत शासन स्तरावर घेतल्या गेलेला नाही.गेल्या 75 वर्षात स्वतंत्र भारतात खामगांव तालुक्यातील बेलुरा हे गाव रस्त्यापासुन वंचीत आहे. दुसरीकडे शासन स्तरावरुन बुलेट ट्रेनच्या बातम्या धडकत असतांना बेलुरा गावावाशीयांवर एक प्रकारे अन्याय होत असुन त्यांना जाण्यासाठी साधा रस्ता सुध्दा शासन स्तरावर निर्णय घेऊन निर्माण केल्या गेला नाही. समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या गप्पा केवळ स्वातंत्र्यदिवसाचे दिन व प्रजासत्ताक दिवशी केल्या जातात व गोडवे गायले जाते. वास्तव चित्र भिषण आहे.

करीता या निवेदनाव्दारे आपणास कळविण्यात येते की, गेल्या 4 दिवसांपासुन बेलुरा वाशियांनी एस.डी.ओ. कार्यालय खामगांव येथे आमरण उपोषण सुरु केलेले आहे. त्याची वेळीच दखल घेऊन शासन स्तरावरून बेलुरा गावाचा रस्ता निर्माण करणेबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा व आमरण उपोषण कर्त्यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा बहुजन समाज पार्टी बुलडाणा जिल्हयाचे वतीने बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील बेलुरा गाव वाशियांना रस्ता मिळुन देण्याकरीता शासन व प्रशासनाचे विरोधात लोकशाहीमार्गाने तिव्र आंदोलन करेल. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ॲड डी एम भगत,
शरद ब्राम्हणे जिल्हाध्यक्ष बसपा,धिरज इंगळे जिल्हा प्रभारी बसपा,ज्ञानदेवराव इंगळे जिल्हा प्रभारी बसपा ङि एम निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष बसपा,नितीन मोरे जिल्हा महासविच बसपा,नितीन मोरे,महेंद्र वानखेडे जिल्हाकोषाध्यक्ष बसपा अरविंद हेलोडे कार्यकर्ता बसपा, विनोद अत्तमगन,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनाशिक महागरपालिका प्रशासक आता जिल्हाधिकारी डी. गंगाथरन
Next articleमुंबईत शिकणाऱ्या त्या मुलीनं घरी सगळं सांगितलेलं,अधीक्षकांवर कारवाईची मागणी, वडिलांनी मुंबईत हंबरडा फोडला वाचा सविस्तर..