Home Breaking News शाळेत टाकता पहिले पाऊल प्रगतीची लागली चाहूल..

शाळेत टाकता पहिले पाऊल प्रगतीची लागली चाहूल..

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थे च्या नूतन मराठी शाळेत प्रवेशोत्सव व स्वागत सोहळा संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल कार्यक्रम उत्साहात संपन्न
सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर शैक्षणिक घोषणा देत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहचिटणीस तानाजी आप्पा जायभावे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व संस्थेच्या संचालिका शोभाताई बोडके, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती फड, लक्ष्मण सानप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना तानाजी आप्पा जायभावे म्हणाले की, शिक्षण व संस्काराशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती अशक्य आहे. प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांवर संस्कार करून विद्यार्थ्यांना आकार देण्याचे महत्त्वाचे काम करतात.
मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेत नव्याने दाखल झालेल्या बालवाडी, पहिली व इतर वर्गातील विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्प व खाऊ देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल उमटवून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले.
नासिक जिल्हा सहकारी महिला बँकेच्या संचालक पदी भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालिका शोभाताई बोडके यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचा आकर्षणाचा विषय म्हणजे शाळेचा पहिला दिवस असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यात आनंदाने उभे राहून स्वतःचे छायाचित्र काढले. विद्यार्थी स्वागतासाठी सुंदर शाळा हे गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती फड यांनी केले. सूत्रसंचालन सौ सीमा ताडगे व आभार श्रीमती जयश्री पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

Previous article*जगणं*
Next articleनविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.