Home Breaking News शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग….

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग….

👉 पेरणी वाया जाण्याची भिती.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 2 जुलै 2023

यावर्षीच्या खरीप हंगाम पुर्णतः जुन महिना कोरडा गेला. दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी तुरळक बरसल्या. आधीच पेरणीला उशीर झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीची धास्ती घेत, दोन दिवसात कपासीची लागवड संपविली. पाऊस आता पडणार म्हणुन, या आशेवर सोयाबीनची पेरणी पन्नास टक्के केली. पण…. नियतीच्या मनात वेगळेच काही होते. हिमायतनगर तालुक्यात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आणि त्यानंतर पाऊस कमालीचा उघडला. शेतीत टाकलेले महागडे खते, बि-बियाणे, लागवडीचा खर्च भरपुर झाला आहे. पण पावसाचा पत्ताच नाही. म्हणुन प्रत्येक शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहतो आहे. आकाश निरभ्र आहे. उन्हाळ्यासारखे उन्हाचे चटके बसत आहेत. आता पेरलेले बियाणे पावसाअभावी वाया जाणार, याच काळजीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसून येत आहेत.

Previous articleहरित क्रांतीचे प्रणेते स्व. मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन उत्साहात साजरा.
Next articleप्रहार संघटनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड……