Home Breaking News प्रहार संघटनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड……

प्रहार संघटनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड……

हिमायतनगर प्रतिनिधी अंगद सुरोशे/-

येथिल शेतकरी कुटुंबातील जिद्दी लढवय्ये नेतृत्व तथा प्रहारचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दि 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लकडोबा चौकातील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे नातेवाईकांनी सांगितले

हिमायतनगर शहरातील एक लढवय्या नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बालाजी बलपेलवाड हे आज पडद्याआड गेले बालाजीराव हे कुटुंबातील युवक ज्याने राजकिय सामाजिक क्षेत्रात पाय ठेऊन अल्पावधीतच अनेक शेतकरी कष्टकरी व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक भ्रष्टाचारी लोकांना उघडे पाडले होते. त्यामुळे बचू कडू यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि एक उभरते नेतृत्व अशी त्यांची जिल्ह्यात छबी निर्माण झाली होती मात्र अचानक 2 वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी मुंबई येथे गहिलोर हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपचार करून ते घरी आले होते.

त्या जीवघेण्या कोरोना काळाच्या प्रसंगातून बलपेलवाड यांनी मृत्यवर विजय मिळवला आणि मूळ गाव हिमायतनगर येथे बरे होऊन आले होते बालाजी राजाराम बल्पेलवाड (झरेवाड) हे पूर्ववत ठणठणीत झाल्याने त्यांनी अनेक मित्र परिवाराना भेटी गाठी वर भर दिला होता पण अचानक काल रात्रीला त्यांचं दुःखद निधन झाले ही वार्ता त्यांच्या निकटवर्तीय लोकांना धक्का देऊन गेली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता हिंदू शमशान भुमी लकडोबा चौक येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या मृत्य पाश्चात्य आई वडील, पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग….
Next articleशिवतेज शिरफुले यांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड.