Home Breaking News मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खामगाव...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खामगाव उपविभागीय कार्यालयात निवेदन

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चार दिवसापून उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून आंदोलन मोडित काढण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून या घटनेच्या निषेध करत खामगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात सकल मराठा समाज बांधव खामगावच्या वतीने या लेखी निवेदनाच्या माध्यमातून तसेच शांततेच्या मार्गाने कायदेशीर रित्या मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी चार्ज च्या निषेध करीत लोकशाहीला कलंकित करणारी घटना जालना जिल्ह्यातील अंतरावलीं सराटी गावात घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू होतं या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असताना सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही जबाबदार मंत्र्यांनी या आंदोलनाला साधी भेट सुद्धा दिली नाही आणि या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नाही त्यामुळे या ठिकाणी उपोषणास बसलेले उपोषण कर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती तरी सुद्धा प्रशासन व शासनाने याची दखल घेतली नाही म्हणून आंदोलन कर्त्यांनी मनोमन निर्धार केला की जोपर्यंत शासन प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण आंदोलन सुरूच ठेवू ठरल्याप्रमाणे शांततेच्या मार्गाने कायदेशीर रित्या आंदोलन सुरू होते आंदोलनाचा वाढता पाठिंबा पाहून शासन प्रशासन हादरले परंतु त्याची दखल ही उलट पद्धतीने घेऊन शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या उपोषण आंदोलना प्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी चार्ज केला हा लाठी चार्ज जणु काही सदर आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न उघडपणे दिसत होता कारण या छोट्याशा गावात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोज फाटा हेल्मेट घालून सुसज्ज स्थितीत पाठवण्यात आला होता त्यामुळे निश्चितच सरकारचा या मागचा उद्देश काय आहे हे घडलेल्या प्रकरणावरून दिसुन येत आहे.ङ्गअगदी शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असताना पोलिसांनी अचानक पणे का लाठीचार्ज करणे हे कितपत योग्य आहे. तसेच हेल्मेट घालून तयारी निशी आलेल्या पोलिसांचा नेमका उद्देश काय? या ऐकणा अनेक प्रशन या घडलेल्या घटने वरुन निर्माण होत आहेत म्हणून मराठा आंदोलकांवर हुकूमशाही पद्धतीने लाठी चार्ज करण्याचे आदेश देणार्‍या अधिकार्‍यांचा व शांततेच्या मार्गाने उपोषण करणार्‍या आंदोलन कर्त्यान वर लाठी चार्ज करणार्‍या अधिकार्‍यांचा आम्ही सर्व सकल मराठा समाज बांधव खामगांवच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत तसेच मराठा समाज आंदोलकावर लाठी चार्ज करण्याकरिता आदेश देणार्‍या अधिकार्‍यांवर व लाठीचार करणार्‍या कर्मचार्‍यांवर कायदेशीर रित्या कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा करीत आहोत. व सोबतच मराठा समाजाची अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागणीचा गंभीरतेने विचार करून कायदेशीर रित्या ओबीसी प्रवर्गाची आरक्षणाची मर्यादा वाढवून वाढविलेल्या ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करवी ही सुद्धा पुनश्च मागणी करीत आहोत. संपूर्ण महाराषट्रातील या अगोदरच्या मराठा समाज आरक्षण आंदोलका वरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. या निवेदना द्वारे केलेल्या सर्व मागण्याचा गंभीरतेने विचार करावा व मराठा समाज आरक्षणाकरिता आंदोलन करणार्‍या आंदोलांकर्त्याना न्याय मिळवून द्यावा ही विनंती जर आमच्या या न्यायिक व रास्त मागण्यांचा विचार शासनाने केला नाही तर आम्ही उग्र व तीव्र प्रकारचे आंदोलन करू जर त्या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे नमुद करण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाज खामगांव, तसेच शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनामध्ये पदाधिकारी असलेले सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Previous article*वंचित बहुजन युवा आघाडीने जाळला एकनाथ शिंदे आणि अजित पवार , फडणवीस यांचा पुतळा..*
Next articleप्रा. डॉ. संघर्ष सावळे यांची संमेलन अध्यक्ष म्हणुन निवड.