Home Breaking News समीर वानखडे NCB जोनल डायरेक्टर यांचे शेगाव मध्ये मोठ्या जल्लोषात सपत्नीक स्वागत

समीर वानखडे NCB जोनल डायरेक्टर यांचे शेगाव मध्ये मोठ्या जल्लोषात सपत्नीक स्वागत

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

शेगाव:-समीर वानखडे हे एक भारतीय राज्यसेवा अधिकारी आयआरएस ऑफिसर आहेत त्यांना भारतामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जनरल डायरेक्टर च्या रूपात ओळखले जात आहेत शेगाव येथील दौऱ्यावर आज आले असता त्यांनी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेला हर अर्पण करून तसेच त्यांच्या पदस्पर्शाने सुरुवात केली तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे खूप मोठे जल्लोषात स पत्नीक क्रांति रेडेकर वानखडे स्वागत पियुष ओवे,प्रविण सर बोदडे, ऍड इशारे सर, अजय सुरवाडे ऍड प्रथमेश माने आनंद गुजर विकास पवार गजानन बांगर अजय सुरवाडे अलकाताई बांगर महेंद्र थेटे शिबू खान बंटी सुर्वे या गावातील लोकांनी खूप मोठ्या जल्लोषाने त्यांचे स्वागत केले समीर वानखडे यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांविषयी समाजाला प्रेरणा मिळावी त्यांच्या संविधानाविषयी संविधानातील कलम विषयी आणि मी आज जो काही आहे तो फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि आम्हाला समर्पित केलेल्या संविधानाच्या जोरावर आहे असे बोलताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी सांगितले.

Previous articleहिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी मध्ये बाधित झालेल्या घरांचे अनुदान तात्काळ वाटप करा :- बाबुराव कदम कोहळीकर 👉🏻शिवसेनेचे मागणी…
Next articleजलंब प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून साखळी उपोषणास सूरुवात