Home Breaking News राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते,नांदेड जिल्हातील भूमिपुत्र आनंद आनेमवाड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ...

राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते,नांदेड जिल्हातील भूमिपुत्र आनंद आनेमवाड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

20 हजार शिक्षकांना तंत्रज्ञान मार्गदर्शक करणारे तंत्रस्नेही शिक्षक.

2018-19 मध्ये नॅशनल ICT अवॉर्ड भारत सरकारकडून प्रदान….

अंगद सुरोशे
हिमायतनगर / प्रतिनिधी

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र मा.श्री. आनंदा आनेमवाड सर रा.बरबडा ता. नायगाव जि. नांदेड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,उल्लेखनीय विद्यार्थी शाळा व शिक्षक समृद्धी उपक्रम जि प शाळा पावन शाळेत रुजू होताच परिसर व विद्यार्थी सर्वेक्षण सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना टीव्ही विषयी असलेले आकर्षण व त्यामुळे होणारी गैरहजेरी लक्षात आली.त्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला स्वतःकडे असलेला टॅबलेट वापरला.स्क्रीन साईज कमी असल्याने व अन्य गोष्टी दाखवण्यास अडचण होत असल्याने शिक्षणसेवक कालावधीत लोन उचलून लॅपटॉप स्पीकर व अन्य साहित्य खरेदी.

विद्यार्थ्यांना आवड निर्माण होऊ उपस्थितीची समस्या कमी झाली. नियमित पालकांना भेटी व संपर्काने पालकांची रुची वाढली स्थलांतराची मोठी समस्या हंगामी वसतिगृह चालवून सोडवली. विद्यार्थी अभ्यास आरोग्य यावर यामुळे काम करता आले त्वचारोग, गालगुंड, वजन कमी असणे यासारख्खा आरोग्य समस्यांवर काम केले विद्यार्थी तंदुरुस्त व निरोगी राहतील यासाठी विशेष पोषक आहार दिला विशेष अध्यापन सत्रांनी विद्यार्थी गुणवत्ता चांगली वाढली. विद्यार्थी विविध शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले पालक शिक्षक सहभागाने शाळेला तारेचे कुंपण बनवले यामुळे परसबाग व इतर उपक्रमांना सरंक्षण मिळाले.

विद्यार्थ्यांना इंग्लिश चोहीकडे व बोलीभाषा असल्याने कातकरी व वारली भाषेतून मराठी भाषेकडे द्विभाषा शब्दकोश बनवला स्मार्ट डिजिटल क्लास चे स्वप्न पूर्ण होत होते तेवढ्यात शाळा बदली झाली व 2014 साली जि प शाळा मल्याण मराठी येथे रुजू बहुभाषिक व अनेक राज्यातून स्थलांतरित होऊन आलेले हिंदी भाषिक तामिळ भाषिक विद्यार्थ्यांना समजून घेतले,शहरातील समस्या व अस्वच्छता त्यांच्या घरभेटीतून जाणवली. मुलांना घेऊन पथनाट्य बसवून परिसरात स्वच्छता जागृती केली.

समुद्र जवळ असल्याने समुद्राच्या पाण्यापासून व गोमूत्र पासून वीजनिर्मिती असे प्रयोग करून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात तसेच अध्यापनात रुची निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले,डिजिटल शाळा यासाठी तालुकास्तरावर तालुक्यातील 100 शिक्षकांची कार्यशाळा घेतली. विविध डिजिटल साहित्याची माहिती देऊन या शाळा डिजिटल कशा होतील यासाठी CSR व इतर बाबींची माहिती दिली,जिल्हा तंत्रस्नेही शिक्षक मार्गदर्शक म्हणून 2016-2018 कालावधीत 6 हजार शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण दिले.

2016 शिक्षणवारी ह्या महाराष्ट्र शासन उपक्रमात AUGMENTED AND VIRTUAL REALITY कलासरूम या भविष्यवेधी शिक्षणाच्या उवक्रमाची मांडणी व सादरीकरण केले. 20 हजार शिक्षकांना याची माहिती दिली. यातून राज्यात या वर्गाची सुरुवात झाली.तंत्रस्नेही मार्गदर्शक म्हणून विविध शासकीय योजनांतुन सर्व शाळांना इ साहित्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. डहाणू तालुका प्रशासनाने 26 शाळांना ऑल इन वन प्रोजेक्टर व जिल्हा प्रशासनाने 400 शाळांना interactive प्रोजेकटर दिले. आ निरंजन डावखरे यांनी अनेक शाळांना interactive प्रोजेक्टर दिले.मित्रा या महाराष्ट्र शासनाच्या इ लर्निंग app साठी कन्टेन्ट निर्माता म्हणून व नंतर भारत सरकारच्या दीक्षा app साठी साहित्य निर्माता म्हणून काम केले आहे. 2022- 23 मध्ये निपुण भारत या उपक्रमसाठीच्या 1000 व्हिडिओ निर्मितीत साहित्य निर्माता व एडीटर म्हणून सक्रिय सहभागी.स्वतःची शाळा डिजिटल व्हावी म्हणून अनेक संस्थांना पत्रव्यवहार केला. 2018- 19 मध्ये thinksharp फौंडेशन कडून 3 वर्ग डिजिटल करून मिळाले. Reliance फौंडेशन कडून एक वर्ग डिजिटल व thinksharp कडून 2021 22 मध्ये स्मार्टबोर्ड मिळाला,डिजिटल बरोबरच सर्व शिक्षा कडून 12 लाखाची प्रयोगशाळा मिळाली. त्याच प्रशिक्षण घेऊन अध्यापनात उपयोग केला,Thinksharp व प्रथम फौंडेएशन कडुन 50 हजाराची पुस्तके मिळवली व पुस्तकालय अधिक समृद्ध केलं.

कोरोना काळात शाळा बंद झाल्यावर शाळेबाहेरील डिजिटल शाळा thinksharp च्या सहभागातून बनवली. एक लाखाचे टॅबलेट विद्यार्थ्यांना उपलब्ध केले. स्वखर्चाने इंटरनेट खर्च भरून. एक वर्ष पूर्ण वर्ग ऑनलाईन चालवले,विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांतील तज्ञ व्यक्तींना कोडींग मीडिया creating इ शिकवण्याकरिता या डिजिटल क्लास मध्ये निमंत्रित केले. शालेय गुणवत्ता व शाळा विकासासाठी kino संस्था नाशिक चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते मिळाला,ब्रिटिश कौन्सिल व टाटा ट्रस्ट कडून राबविण्यात आलेल्या टॅग प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात इंग्रजी विकसन साठी काम केले,तंत्रस्नेही अध्यापण प्रशिक्षण या कार्यासाठी 2021 मध्ये 2018-19 साल चा नॅशनल ICT अवॉर्ड भारत सरकारकडून प्रदान.कोरोना काळात लोकमत कडून विशेष काम करणाऱ्या शिक्षकांच्या अतुल कुलकर्णी सरांनी केलेल्या वृतांकणात समावेश.प्रशासकीय बदलीने तालुक्यातील दुर्गम शाळा जि प शाळा महालपाडा इथे बदली झाली.106 पट असलेली द्विशिक्षकी शाळा. कातकरी बहुल असलेली शाळा स्थलांतर समस्या प्रचंड असलेली शाळा मिळाली,नवीन आव्हान स्वीकारून पहिल्या 4 महिन्यात 40 उपस्थिती आता 90 पेक्षा जास्त वर आलेली आहे.
संस्था सहभागातून विद्यार्थ्यांना पुरेशा वह्या, दप्तर, ड्रेस बूट इ दिले.पूरक आहारात फळे व इतर पोषक घटक वाढवले.

2 वर्षांपासून बंद असलेली सोलर वीज व्यवस्था ग्रामपंचायतीच्या मदतीने सुरू केली. 10 वर्षांपासून बंद असलेले वीजमीटर नवीन नोंदणी करून चालू केले.Thinksharp फौंडेशनकडून 2 लाखाचे अद्ययावत डिजिटल स्मार्टबोर्ड मिळाला.ग्रामपंचायत कडून कंपाऊंड स्वच्छतागृह शालेय क्रीडासाहित्य इ प्रस्तावित,स्थलांतर होणाऱ्या पालकांच्या उधबोधनातून काही विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यात यश,PM इ विद्या उपक्रमातीळ पाच TV चॅनेल पैकी एका चॅनेल चे SRG म्हणून निवड, 2021 मध्ये लोकतंत्र न्युज लाइव्ह महाराष्ट्र समूहाचे प्रमुख तंत्रज्ञान मार्गदर्शक,राज्यभरातील शिक्षकांच्या इ साहित्याचे प्रसारण करण्यासाठी नवीन भूमिका निवड.शिक्षकांच्या उपक्रमासाठी प्रतिष्ठित शरद पवार इंस्पायर फेललोशिप 2024-25 साठी निवड विद्यार्थी शाळा शिक्षक हितासाठी सदैव कार्यरत कार्यप्रवण व्यक्तीला 2024 महाराष्ट्रीयन इयर ऑफ द पुरस्काराने सन्मानित आनंद बालाजी आनेमवाड केले आहे,यांचे सर्व मित्र परिवार, विद्यार्थी, पालक, गोल्ला गोलेवार यादव समाजातून व, सर्वांकडूनच भरभरून कौतुक होताना दिसत आहे.

Previous articleयेवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक
Next articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आर्यन्स ग्रुप तर्फे भव्य मॅरेथॉनचे आयोजन,