Home Breaking News नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

(निफाड )नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्यांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली यासंदर्भात नाशिक जिल्हा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समिती आक्रमक झालेले आहे व त्या संदर्भात समितीचे मार्गदर्शक मुकुंदराजे होळकर अध्यक्ष समाधानजी बागल, जयेश जगताप, प्रशांत वाघ,दत्ता आरोटे सचिन वडघुले, संदीप क्षीरसागर,व इतर समिती सदस्य यांच्याकडून तहसीलदार व इतर प्रशासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले. सदर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये असल्याने त्या वाड्याचं ऐतिहासिक महत्त्व हे असाधारण आहे अशा परिस्थितीमध्ये या वाड्यात झालेली तोडफोड ही इतिहास प्रेमींच्या मनाला चटका लावणारी ठरलेली आहे या संदर्भात विविध प्रशासकीय कार्यालयांमार्फत कार्यवाही हवी यासाठी समाधानजी बागल व तसेच जिल्ह्यातील इतर इतिहास प्रेमींकडून निवेदन देऊन प्रशासनास साकडे घालण्यात आलेला आहे होळकर वाड्यामध्ये विठ्ठल मंदिर श्रीकृष्ण मंदिर व राम मंदिर अशी मंदिरे तेथे असून अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा वाडा आहे या वाड्यामधून काही काळ होळकर प्रशासनाचे प्रशासन कार्य करत होतं अहिल्यादेवी होळकर यांना त्यांचे सासरे मल्हार रावजी होळकर यांच्याकडून जी काही खाजगीची संपत्ती देण्यात आली होती त्या संपत्तीमध्ये नांदूर मध्यमेश्वर हे गाव त्यांच्या खाजगी जहागिरीतील गावांपैकी एक होते त्यामुळे ह्या गावातील कर वसुली व इतर सर्व संपत्तीवर स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाच फक्त अधिकार होता त्यामुळे मातोश्रींच्या स्वतःच्या संपत्तीवर या ठिकाणी घाला घालण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला त्यामुळे अहिल्यादेवी होळकर प्रेमी इतिहास प्रेमी व इतर सर्वच इतिहास अभ्यासकांनी यावरती नाराजी व्यक्त केल्या असून त्या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची भावना आहे नांदूर मधमेश्वर नगरीला लाभलेली ही एक ऐतिहासिक देणगी आहे त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर येथील मंदिर मृगव्याधेश्वर मंदिर, मध्यमेश्वर मंदिर, गणेश मंदिर ही समकालीन मंदिरे त्याच काळातले आहे व वाड्याचा काही भाग त्याचप्रमाणे हवेली हे सध्या जमीन दोस्त होत चाललेले दिसून येते परंतु आतापर्यंत शाबूत असणारा वाडा हा परत एकदा त्याची दुरुस्ती करून त्या वाड्यात पुनर्जीवन मिळावे अशी या ठिकाणी गरज भासत आहे. हा वाडाही त्याच काळातील असल्याने या वाड्याचे एक ऐतिहासिक महत्त्व हे इतिहासाच्या दृष्टीने निर्माण झालेला आहे या वाड्यामध्ये पूर्वी धाब्याची घर होती त्या ठिकाणची सागाची लाकडे फळ्या व इतर मौल्यवान लाकडी चीज वस्तू चोरीला गेल्या या संदर्भात या ठिकाणी स्थानिकांकडून बोलण्यात येत आहेत त्याचप्रमाणे वाड्याची भिंत पाडून त्या ठिकाणाहून त्या वस्तू चोरून नेण्यासाठी व इतर वस्तू नेण्यासाठी प्रयत्न केल्याच दिसून येत आहे तरी या सर्व गोष्टींवर लक्ष घालून त्या होळकर वाड्याची योग्य निगा राखण्यात यावी यासाठी समाधानी बागल व त्यांची टीम आता मैदानात आल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे होळकर वाड्यामध्ये असणारा राम मंदिर हे अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील मूर्ती असून गाभारा व त्यातील लाकडी बांधकाम ही पुरातन आहे आणि म्हणून त्याचा संवर्धन व्हावं रक्षण व्हावं ही इतिहास प्रेमींची मागणी आहे काही लोकांकडून राम मंदिर बांधणीसाठीचा प्रश्न समोर येत आहे परंतु राम मंदिरासाठी आमची कुठलीही नाय हरकत नाही असे समितीचे अध्यक्ष समाधानी बागल यांनी सांगितले त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यामध्ये जर राम मंदिर होत असेल तर काशी विश्वनाथ व आयोध्या या ठिकाणी झालेल्या राम मंदिरासमोर ज्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांची स्मारक ठेवून त्यांचा योग्य सन्मान राखण्यात आला त्याचप्रमाणे होळकर वाड्याचा संवर्धन करून त्याची डाकडोजी करून वाड्यामध्ये राम मंदिर बांधल्यास राम मंदिर समोर मातोश्री अहिल्यादेवींचा स्मारक उभं करावं अशा स्वरूपाची मागणी समितीकडून करण्यात आलेली आहे सदर कामांमध्ये समाधानी बागल यांनी प्रत्यक्ष वाड्याचा दौरा करून पूर्ण माहिती घेतली व त्यानंतर कारवाईसाठी शासनाकडे साकडे घातला आहे होळकर ट्रस्ट यांच्याकडूनही यासंदर्भात पत्र ग्रामपंचायत व इतर कार्यालयांना आल्याची माहिती मिळाली आहे तसेच सदर मंदिरामध्ये कुठलेही नवीन जुने दुरुस्तीचे काम हे ट्रस्टच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही असे ट्रस्टचे म्हणणे आहे ही ऐतिहासिक वस्तू जपण्यात यावी व होळकर वाड्याचं पुनर्जीवन करण्यात यावं त्याचप्रमाणे होळकर वाड्यामध्ये मातोश्री अहिल्यादेवींचे स्मारक असावं अशी मागणी समाधान जी बागल व त्यांच्या टीम कडून प्रशासकीय कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली व याच पद्धतीचे अर्ज त्यांनी पुरतत्व विभाग व इतर शासकीय कार्यालयांनाही दिल्याची माहिती समाधान बागल यांनी दिली. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्ह्यात आपल्या कार्याचा ढसा उमटवला होळकर शाही चा इतिहास जागृत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील होकरशाहीच्या पाऊलखुणा जागृती रहाव्या व ऐतिहासिकवास्तू जपवणूक व्हावी. यासाठी समिती आक्रमक पावले उचलतात चांदवड चा होळकर वाडा असेल रामकुंड पंचवटी अहिल्या घाट असेल त्र्यंबकेश्वर मंदिर करंजी खुर्द, लासलगाव किल्ला, मल्हारगड चांदवड, गंगापूर नासिक, निफाड नांदूर मधमेश्वर अशा ठिकाणी होळकरशाहीच्या ऐतिहासिक वास्तू आहे त्या जपुनुक करण्याची काम समितीच्या वतीने करण्यात येते. असे समितीचे अध्यक्ष समाधान जी बागल यांनी सांगितले आहे.

Previous articleशेतीला पूरक अधिक उत्पन्न देणारा शेळी पालन व्यवसाय— श्री. सिद्धेश्वर (बापू) शिंदे
Next articleमंगलमुर्ती हास्य क्लबच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त हास्य दिंडीचे आयोजन