संदिप देवचे 9860426674
जलंब:आज जलंब पोलीस स्टेशन सह पि.राजा पोलीस स्टेशन ईमारतीचे उटघाटन मा.कामगारमंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते जलंब पोलीस स्टेशन येथे झाला.
खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उप अधीक्षक कारखेडे, तहसिलदार दिपक बाजड जलंब गावच्या सरपंच वैशालीताई सुनिल हेलोडे
आदी अधिकारी पंच कोशीतील ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनची प्रशस्त इमारत लोकांच्या सेवेत लवकरच रुजू होईल आणि लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना मदतीचा हात देत पोलीस विभाग परिसरात चांगले वातावरण निर्माण करेल, असा विश्वास मंत्री ना. अॅड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.
जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामासाठी ना. अॅड आकाश फुंडकर यांनी २० कोटींचा निधी आणला आहे. त्यांच्या प्रयत्नाने पिंपळगाव राजा, जलंब, मेहकर आणि जळगांव जामोद येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम मंजूर झालेले आहे. जलंब पोलीस स्टेशनची इमारत ही १९१७ सालच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ती जीर्ण झाली असल्याची दखल घेत ना. फुंडकर यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. जलंब पोलीस स्टेशनचा परिसर एकूण १३,४०० चौ. मीटरचा आहे. या नवीन इमारतीमध्ये ४५० चौ. मी क्षेत्रात तळ मजला आणि तेवढ्याच क्षेत्रात पहिला मजला असे इमारतीचे बांधकाम होणार असल्याची माहिती जलंब पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी प्रास्ताविकात दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष देशमुख तर आभार प्रदर्शन पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गुजर यांनी केले.