मराठी राजभाषा गौरव दिन’ आज हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच हिंदी प्राथमिक विद्यालय दत्त चौक,सिडको,नाशिक” या विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा.ज्येष्ठ मुख्याध्यापिका सौ. मीनाताई सांगळे उपस्थित होत्या , आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की ,दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवीश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर (उर्फ कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला, तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काही कविता व गाणीही सादर केली.
प्रमुख पाहुण्या सौ. आशालताताई देवळीकर यांनी भाषा विषयाची महत्त्व सांगून मराठी मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ. रौंदळ मॅडम यांनी इंग्रजी शिकविताना त्याला पर्यायी असणारे जास्तीत जास्त मराठी शब्द वापरावेत व मराठीमध्येही इंग्रजी शब्दांचा वापर करण्याऐवजी मराठी पर्यायी शब्दांचा वापर करावा व आपल्या मराठी भाषेचा सन्मान वाढवावा असे सर्वांना मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.वर्षा सानप मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्त्व व वापर याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी शाळेच्या सर्व मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला, त्यानंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.माया नाईक मॅडम व हिंदी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यादव मॅडम यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. पूजा जगताप* मॅडम यांनी केले .
आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे हिंदी भाषिक विद्यालय असतानाही सर्व विद्यार्थ्यांनी आजचा पूर्ण दिवस मराठी भाषेमधूनच एकमेकांशी संवाद साधला आजच्या दिवसभराचे कामकाज मराठी भाषेमधूनच पार पाडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शाखाप्रमुख अलगट व्ही.के. सर पर्यवेक्षिका सौ.माया नाईक मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी*. यांनी प्रयत्न केले.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.