Home Breaking News भोईमुग ( शेंगदाणे ) बियाणे पेरलेले उगवलेच नाही.

भोईमुग ( शेंगदाणे ) बियाणे पेरलेले उगवलेच नाही.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 01 मार्च 2025

नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील अल्पभुधारक शेतकरी लक्ष्मण जक्कावाड यांनी नांदेड येथील नवा मोंढा येथील उत्तम कृषि सेवा केंद्र यांनी बिल नंबर 8623 वेस्टर्ण कंपनीच्या चार बॅग पुर्णपणे उगवण झालेली आहे. आणी ईतर कोणत्याही कंपनीच्या मला बॅग देऊ नका…सावकार…असे सांगितल्यावर सुध्दा इंडो कंपनीच्या तिनं बॅग आम्हाला दिल्या. त्या बॅग पेरल्याने त्यांची उगवण दहा ते पंधरा टक्के उगवण झाली..असे त्या क्षेत्रावरील छायाचित्रात दिसत आहे..एकंदरीत हे सांगताना शेतक-यांचे अश्रु अनावर झाले होते…कारण त्या शेतक-यांनी व्याजाने पैसे काढुन हे बियाणे खरेदी केले आहे. सर्वे नंबर 50/अ/1 क्षेत्र 0.60 हे. वर पेरणी केली आहे. वरील इंडो कंपनी व संबधित कृषि सेवा केंद्रावर जिल्हा अधिक्षक कार्यालय नांदेड काय? कार्यवाही करणार आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..

आधीच मरणयातना भोगत असलेल्या शेतक-यांना न्याय मिळेल का? हेही महत्वाचे आहे.

Previous articleभुगर्भातील पाणीपातळी खाली गेल्याने विहीरीने गाठला तळ.
Next article