Home Breaking News उरळ पोलीसांची मोठी कारवाई,

उरळ पोलीसांची मोठी कारवाई,

डिझेलची चोरी करणाऱ्यांने तीन आरोपी उरळ पोलिसांच्या ताब्यात

भूमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे

उरळ:- पोलीस स्टेशन उरळ हद्दीत काल रोजी रात्री ११/०० ग्राम गायगाव येथील पेट्रोलियम डेपो परिसरात रात्री दरम्यान काही इसम डिझेलची साठवणूक करून विक्रीकरिता बसलेले आहेत .अशी गुप्त बातमीदार कडून माहिती ठाणेदार अनंतराव वाडकर यांना मिळाल्याने .माहितीच्या आधारे तात्काळ गायगाव iocl डेपो परिसरात पोस्टाफसह पोहोचून डेपो परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता .तीन इसमांना पाच डिझेलच्या कॅन सह त्यांचा पाठलाग करून उरळ पोलीसांनी पकडले आरोपी १) विजय समाधान वानखडे,२) भळ्या उर्फ अशोक सोनाजी वानखडे,२) गजानन विष्णू खेकडे सर्व राहणार गायगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून डिझेल ने भरलेल्या पाच कॅन ज्यामध्ये 195 लिटर डिझेल किंमत अंदाजे 14,250/- असा मुद्देमाल जप्त करून रात्री उशिरा दरम्यान पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध कलम ३,७ EC act प्रमाणे कार्यवाही करून तिन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे . कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार, psi राजेंद्र मोरे, अंमलदार विजयसिंह झाकर्डे, रघुनाथ नेमाडे, सुनील सपकाळ, कांताराम तांबडे यांनी हि कारवाई केली.

Previous articleधनगर समाजातील मुलांसाठी शासकिय वसतिगृह शिंदे सरकारचा स्तुत्य निर्णय
Next articleउत्कर्ष ज्ञानपीठ निंबा फाटा येथे दहिहंडी उत्सव साजरा