Home राजकारण अखेर…. शिवबंधन बांधले! 👉 मा. खासदार सुभाष वानखेडे यांचा शिवसैनेत प्रवेश.

अखेर…. शिवबंधन बांधले! 👉 मा. खासदार सुभाष वानखेडे यांचा शिवसैनेत प्रवेश.

@ राजकीय वार्तापत्र @

मारोती अक्कलवाड पा सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 20 जुलै 2022

हदगाव हिमायतनगर तालुक्यावर एकेकाळी ज्यांनी सलग पंधरा वर्षं आमदार आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात पाच वर्ष खासदार म्हणून नेत्रुत्व केले. असे लोकप्रिय नेते सुभाष वानखेडे यांनी काॅग्रेसला सोडचिठ्ठी देऊन,
सर्व शिवसैनिक व युवासैनिकांना सोबत घेऊन, *माजी खासदार सुभाष वानखेडे हे पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या हस्ते मातोश्री भवन मुंबई येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सुभाष वानखेडे हे ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील लोकप्रिय आणि अस्सल ग्रामीण बोलीभाषेत मतदारांना आकर्षित करणारे नेते आहेत. अगोदर शिवसेनेचे खासदार ते पाच वर्ष होते. त्यानंतर मध्यंतरी त्यांनी भाजप, काॅग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मोदी लाटेत 2014 साली त्यांचा निसटता पराभव झाला. त्यावेळी स्व.लोकप्रिय, ओबिसीनेते राजीव सातव यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 साली काॅग्रेस पक्षात प्रवेश करुन, राजीवजी सातव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आणि मोठ्या मनाने काॅग्रेस पक्षाकडून सुभाष वानखेडे यांना लोकसभेचे तिकीट दिले. पण तत्कालीन शिवसेनेचे नांदेडचे आमदार आणि विद्यमान हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी तब्बल तीन लाख मतांनी त्यांचा पराभव केला. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात जे काही राजकीय उलथापालथ झाली. आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेगट व भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार आले. विद्यमान खासदार हेमंत भाऊ पाटील हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटात सामील झाले. आणि त्याच संधीचा फायदा घेत सुभाषराव वानखेडे यांनी आज मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसैनेत प्रवेश केला आहे. सोबत माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, संपर्क प्रमुख आदी नेते उपस्थित होते.
सुभाष वानखेडे यांनी शिवसैनेत प्रवेश केल्यानंतर हिमायतनगर हदगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडुन आतिषबाजी केली आहे. आगामी काळात जनतेची कामे करुन दोन्ही तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा. हिच सर्व सामान्य शेतकरी, शेतमजुर आणि सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. असे नागरिक बोलवुन दाखवित आहेत.

Previous articleमाजी उपसभापती माधव कदम शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले भेटून समर्थन!
Next articleमिरखेल ते फुकटगाव मार्ग रस्ता दुरुस्त करण्याची संभाजी सेनेची मागणी