Home Breaking News संभापूर येथे “स्वच्छता ही सेवा”चा नारा..

संभापूर येथे “स्वच्छता ही सेवा”चा नारा..

स्वच्छता मोहीमेत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग तर काहींच्या दांड्या..!!

संभापूर :- (अजयसिंह राजपूत) स्वच्छता पंधरवडा निमित्त रविवारी 1 ऑक्टोबर 2023 रोजी भारत सरकारच्या स्वच्छता भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये 1 तास स्वच्छतेसाठी देण्याचा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता पंधरवडा निमित्त संभापूर ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (ता.1 ऑक्टोबर )रोजी सरपंच ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संभापूर ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसर व गावात सार्वजनिक ठिकाणी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सरपंच ज्योती पवार, उपसरपंच राष्ट्रपाल दांडगे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गवारगुरू, संगिता गवारगुरू, गजानन गावंडे,ग्रामसेवक सि एम जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोपनारायन सर, सोळंके मॅडम, भगवान कडाळी सर, चौधरी सर,चराटे सर, आशा सेविका पुजा इंगळे, अंगणवाडी सेविका संगिता पवार, मदतनीस प्रतिभा पवार,सिआरपी जयश्री गवारगुरू,व उपस्थित माया सुरवाडे, संगिता दरबारसिंह पवार,मंगलसिंह इंगळे, शांताराम गाडेकर, दिनेश गवारगुरू, राजेंद्र राजपूत, अनिल गाडेकर, विवेक पवार, संतोष पवार, विलाससिंह पवार,आधारसिंह पवार, राहुल गाडेकर,आदी मोठया संख्येने जमलेले ग्रामस्थ महिलांनी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात एक तास श्रमदान करून आपल्या गावाची तसेच सार्वजनिक परिसराची प्रत्यक्षरित्या साफ-सफाई व स्वच्छता केली. ‘स्वच्छता ही सेवा २०२३’ची थीम ‘कचरामुक्त भारत’ही आहे. यामध्ये दृश्‍यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छता ही सेवा है आणि सेवा हाच परमो धर्म या उक्ती प्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे याचीही जाणीव सरपंच ज्योती पवार यांनी सर्व ग्रामस्थांना करून दिली.

Previous articleभारतीय संविधानिक मूल्य-विचारांशी छेडछाड देशाच्या अखंडतेला घातक : ऍड.असीम सरोदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट
Next articleराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने हिमायतनगर येथील प्रगती कोचिंग क्लासेस यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षेचे वितरण….