Home Breaking News उत्कर्ष ज्ञानपीठ निंबा फाटा येथे दहिहंडी उत्सव साजरा

उत्कर्ष ज्ञानपीठ निंबा फाटा येथे दहिहंडी उत्सव साजरा

भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे

लोहारा:- निंबा फाटा येथील उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . असून यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कौतुकास्पद होता .साहसी,धाडसी वृत्तीने विद्यार्थ्यांनी दहीहंडी मोठ्या उत्साहाने फोडण्यात आले.यामध्ये सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यां कडून सराव करून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग करूण घेतला होता. यामध्ये मुख्याध्यापक बढे ,उपमुख्याध्यापक .प्रा.मारोती उंबरकार ,पर्यवेक्षक. प्रा.निलेश तायडे ,तायडे मॅडम,आरती इंगळे मॅडम,मयुरी गव्हाळे मॅडम, राहुल वानखडे, वाकळे मॅडम,व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्कर्ष ज्ञानपीठ शाळेत विवीध उपक्रम राबवत असतात. अशाच उपक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या शिक्षीका सौ तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुण मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या शिक्षिका इंगळे मॅडम,गव्हाळे मॅडम,तथा वाकळे मॅडम यांनी राधा व श्रीक्रुष्णाच्या कलाक्रुतीत मुलांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपाल माठे,नरेंद्र शेगोकार,रमेश शेगोकार,मोहोळ बाई,बबलू भाऊ.यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले असून यामध्ये पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Previous articleउरळ पोलीसांची मोठी कारवाई,
Next articleकार चोरी करणाऱ्या टोळीस हिमायतनगर पोलिसाने केले गजाआड…