Home Breaking News बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्या…

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्या…

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:-

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबली महाविहार व्यवस्थापन हे बौद्ध भंतीच्या हाती देण्यात यावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा हिमायतनगर कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले समस्त बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ बुद्ध गया येथे मागील पंधरा दिवसापासून बौद्ध भिकू आणि बौद्ध अनुयायाचे आंदोलन सुरू आहे.

व बाहेर देशांमध्ये देखील आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने सदरील महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता आज दिनांक 6 मार्च रोजी निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदय यांना देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पदाधिकारी प्रताप रोकडे तालुकाध्यक्ष सुरेश गडपाले सरचिटणीस बाबासाहेब मुनेश्वर प्रताप लोमटे चंद्रकांत हनवते स्वप्निल हनवते विश्वनाथ खिराडे सर बबन कामाजी जाधव अनिल तुकाराम हाटे पत्रकार कैलास कांबळे पोलीस पाटील संदेश तुळसे बळीराम येरेकर नितीन प्रकाश हनवते आकाश कदम कांताबाई जाधव कांताबाई गायकवाड बेबाबाई हनवते मारुती हनवते पत्रकार एसपी गुंडेकर विजय वाठोरे वैभव कदम आदरणीय भंते सारीपुत थेरो यांच्या सह उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous article
Next articleसराईत गावगुंड धम्मपाल येरेकारवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, हिमायतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या……