Home Breaking News अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

अकोला : दि. ६ जून २०२४ :- अकोला बाळापूर मार्ग (तुषार हाँटेल) शेगाव टी पॉइंट जवळ टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांना आपला जीव गमवावा लागला.आज बारा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झालाय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगामुळे घसरली आणि मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक खाली आली..या अपघातात शिवणी येथील श्याम महाले आणि उमरी येथील सचिन जूनारे या व्यक्तींचा समावेश असून पोलीस अधिक तपास करीत आहेय…

Previous articleफटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना
Next articleशेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळेना!