मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 मार्च 2025
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरपल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह व तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन गावकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व अन्नदान सोहळ्याचे दिनांक 19 मार्च 2025 ते 26 मार्च 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्य गोपाळगिर महाराज श्री दत्त संस्थान दतबर्डी, प.पु. तपस्वी बालयोगी व्यकंट स्वामी महाराज , गुरूवर्य शंकरबन महाराज, गुरुवर्य ईश्वरगीरी महाराज, गुरूवर्य नारायण गिरी महाराज, गुरुवर्य देवागिरी, यांच्या कृपाआशिर्वादाने…व्यासपिठ रामदास महाराज ठाकरवाडीकर हे सांभाळणार आहेत.काकडा व हरिपाठ श्रीराम महाराज बेले व सौ. लक्ष्मीबाई बेले हे सांभाळणार आहेत. संगिता व्यासपिठकथा वाचक हभप दत्तात्रय महाराज फुलारी ( गुरुजी लातुर) हे सांभाळणार आहेत. बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी शांत्तीब्रम्ह, श्री हभप परमेश्वर महाराज जायभाये ( देवाची आळंदी), 20 मार्च रोजी विदर्भरत्न हभप संजय महाराज पाचपोर, बुलढाणा, 21 मार्च त्यागपुर्ती हभप पांडुरंग महाराज घुले, जुन्नर 22 मार्च रोजी विनोदमुर्ती हभप देवराव महाराज गायकवाड दौंड पुणे, दि. 23 मार्च रोजी ज्ञानसिंदु हभप संदिपान महाराज
हसेगांवकर, दि. 24 रोजी हभप महादेव महाराज राऊत , बिड , दि. 25 रोजी 
ज्ञानेशभक्त आचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, बिड, दि. 26 मार्च रोजी सायंकाळी भागवताचार्य हभप दत्तात्रय महाराज फुलारी लातुर यांचे किर्तनाची सेवा होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर, मा. खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कोहळीकर, मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी व समस्त भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ भाविकभक्तांनी याचा लाभ घ्यावा.असे आवहान सिरपल्ली येथील नागरीक व भाविक भक्तांनी केला आहे.



